व्हिडिओ व्हायरल; वय फक्त आकडा, एका मिनिटांत 40 पुश अप्स

त्याच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या लाईक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत.
actor milind soman
actor milind soman Team esakal

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द मॉडेल आणि अभिनेता म्हणून प्रख्यात असणारा मिलिंद (bollywood model and actor milind soman) त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. त्याचं संपूर्ण कुटूंब फिटनेस फ्रीक म्हणून प्रख्यात आहे. आता मिलिंदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानं एका मिनिटांत चाळीस पुश अप्स (push ups) मारले आहेत. त्याच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या लाईक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत. (milind soman 40 push ups in a minute says no time is not an excuse?)

मिलिंद नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (active on social media) असणारा कलावंत आहे. तो त्याच्या वादग्रस्त स्वभावासाठीही प्रसिध्द आहे. काही महिन्यांपूर्वी तो गोव्यात एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी गेला होता. तिथं त्यानं न्युड फोटोशुट केले होते. त्यामुळे तो चर्चेत आला होता. त्याच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता त्याच्या पुश अप्सचा व्हिडिओ हजारोंच्या संख्येनं लाईक्स मिळवताना दिसत आहे. गेल्या वर्षी त्याचे आत्मचरित्रही प्रसिध्द झाले होते. त्यालाही वाचकांचा प्रतिसाद मिळाला होता.

मध्यंतरी एका महिलेनं त्याच्या बरोबर फोटो काढण्याची इच्छा त्याला बोलून दाखवली. त्यावेळी त्यानं त्या महिलेला रस्त्यावर पुश अप्स काढायला लावले. तो व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यावेळी मिलिंद चर्चेतही आला होता. त्याचा आताचा व्हिडिओ चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. त्यात त्यानं वर्क आऊट करतानाचे काही फोटो शेअर केले आहे.

actor milind soman
चित्रपट निर्माती आयशाचा जामीन न्यायालयानं ठेवला राखून
actor milind soman
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत सरु आणि सुर्याची लगीनघाई

त्या व्हिडिओमध्ये एका मिनिटांत 40 पुश अप्स करताना दिसतो आहे. ज्याचे त्याच्या चाहत्यांनी कौतूक केले आहे. फॅन्सला त्याचा तो वेग पाहून आश्चर्य वाटले आहे. या वयातही मिलिंदनं तरुणांना आव्हान दिले आहे. फिटनेस प्रेमींसाठी हा व्हिडिओ प्रेरणादायी म्हणावा असा आहे....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com