मिलिंद सोमण यांच्या आईने वयाच्या ८१ व्या वर्षी केलेल्या पुशअप्सचा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्याचं पारणं फिटेल..

टीम ई सकाळ
सोमवार, 6 जुलै 2020

 मिलिंद सोमण यांची आई देखील फिटनेसच्या बाबतीत सतर्क असते. त्यांचे फिटनेसचे व्हिडिओ पाहून तर भल्या भल्यांना लाज वाटेल. काही महिन्यांपूर्वी त्यांचा दोरी उड्या खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आताही असाच एक फिटनेस व्हिडिओ व्हायरल होत आहे

मुंबई- बॉलिवूड अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि त्यांची पत्नी अंकिता कुंअर ही जोडी फिटनेससाठी ओळखली जाते. केवळ हे दोघेच नाही तर मिलिंद सोमण यांची आई देखील फिटनेसच्या बाबतीत सतर्क असते. त्यांचे फिटनेसचे व्हिडिओ पाहून तर भल्या भल्यांना लाज वाटेल. काही महिन्यांपूर्वी त्यांचा दोरी उड्या खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आताही असाच एक फिटनेस व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षीही १५ पुश अप्स मारुन अनेकांना तोंडात बोटं घालायला लावली आहेत.

हे ही वाचा: अजय देवगणने केली त्याच्या 'या' आगामी सिनेमाची तारीख जाहीर

मिलिंद सोमण यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या पुश अप्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा फिटनेस व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मिलिंद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, '३ जुलै २०२०. आईचा ८१ वा वाढदिवस लॉकडाऊनमध्ये साजरा केला. आम्ही १५ पुश अप्स आणि अंकिता कुंअरने बनवलेल्या वॅनिला बदाम केकसोबत पार्टी केली. हॅप्पी बर्थडे आई. अशीच हसत राहा.'  

मिलिंद सोमण यांच्या आईचा हा पहिलाच फिटनेस व्हिडिओ नाहीये याआधी देखील मिलिंद यांची आई उषा सोमण यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या आईचे या वयातील हैराण करणारे असे व्हिडिओ मिलिंद अनेकदा सोशल मिडियावर शेअर करत असतात. याआधी मिलिंद यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये आई उषा आणि पत्नी अंकिता एकत्र इमारतीच्या गच्चीवर लंगडी खेळताना दिसून आल्या होत्या.

याव्यतिरिक्त या वयातही उषा यांनी मुलगा मिलिंदसोबत दोरीच्या उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर आला होता. हे व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप गाजले होते. 

मिलिंद सोमण हे सिनेमांसोबतंच त्यांच्या फिटनेससाठी खास ओळखले जातात. मिलिंद त्यांच्या एका फोटोशूटमुळे देखील चांगलेच चर्चेत आले होते. ५४ वर्षीय मिलिंद यांनी २८ वर्षाच्या अंकिता कुंअरसोबत २०१८ मध्ये लग्न केलं होतं. या दोघांच्या वयातील फरकामुळे यांचं अफेअर आणि लग्न चर्चेत राहिल होतं.  

milind soman shares mother usha soman push ups video on her 81st birthday  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milind soman shares mother usha soman push ups video on her 81st birthday