Mirzapur 3
Mirzapur 3Esakal

Mirzapur 3: मुन्नाच्या मृत्यूचा बदला घेणार बायको...'मिर्झापूर 3' ची स्टोरी झाली रिव्हिल....

मिर्झापूर या वेब सिरिजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आता चाहते मिर्झापूर 3 ची वाट पाहत आहे. मिर्झापूर या वेबसिरिजनं मनोरंजन विश्वात वेगळीच जागा निर्माण केली आहे. या वेबसिरिजची क्रेझ चाहत्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

Mirzapur 3
Shah Rukh Khan Duplicate : गरीबांचा शाहरुख पाहिलाय? व्हिडिओ पाहिल्यावर जाल चक्रावून!

जितकी ही वेब सिरिज गाजली तितकेच या सिरिजचे मिम्सही. अजूनही सोशल मिडियावर या सिरिजमधल्या अनेक डॉयलॉगचे व्हिडिओ व्हायरल होतांना दिसतात. चाहते या सिरिजच्या तिसऱ्या भागाबद्दल जाणुन घेण्यासाठी खुप उत्सूक असतात. दरम्यान मिर्झापूर 3 या सिरिजबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

ईशा तलवार जिने मिर्झापूरमध्ये माधुरी यादवची भूमिका साकारली आहे. माधुरी मुन्ना भैय्याची पत्नी होती. मात्र, मिर्झापूर सीझन २ मध्ये गुड्डू पंडित (अली फजल ) मुन्नाला शूट करतो. आता यातच ईशाने मालिकेच्या कथेबाबत एक नवीन अपडेट दिले आहे.

Mirzapur 3
Adipurush Movie: प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक सीट सोडणार! आदिपुरुषच्या मेकर्सचा निर्णय

मिर्झापूर सीझन 3 मध्ये, ती मुन्ना भैय्याच्या विधवा बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती गुड्डू पंडित म्हणजेच अली फजल आणि गोलू गुप्ता (श्वेता त्रिपाठी शर्मा) यांना भिडणार आहे. तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेणार आहे.

'मिर्झापूर 3' मध्ये 'माधुरी यादव' ची भूमिका करणारी ईशा तलवार म्हणाली, 'माधुरी यादवने, जसं आपण सीझन 2 मध्ये पाहिले होते, शेवटी 'कलिन भैय्या'कडून जवळजवळ सत्ता हिसकावून घेतली होती, ज्याची भूमिका अप्रतिम पंजक त्रिपाठीने साकारली होती. 

जेव्हा तुम्ही शोमध्ये एवढी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारता तेव्हा हाय-ऑक्टेन ड्रामा पाहण्यासाठी तयार रहा.

 या क्षणी, मी शोबद्दल अधिक काही उघड करू शकत नाही. शो रिलीजच्या जवळ आल्यावर अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल. 

या क्षणी, 'मुन्ना'च्या मृत्यूबद्दल प्रेक्षक अजूनही संभ्रमात आहेत असं मला वैयक्तिक अनुभवावरून माहित आहे.

Mirzapur 3
Bipasha Basu : काय आहे बिपाशाच्या लेकीचं नाव? अभिनेत्रीनं केलं नामकरण

शोमध्ये एवढं महत्त्वाचं पात्र दिसल्यावर नाटकाशिवाय कशाचीही अपेक्षा करू नका. या सिरिजचा तिसरा भाग शोच्या जवळ असलेल्या दुसर्‍या भागालाच जोडून असू शकते. मात्र मुन्नाच्या मृत्यूनं प्रेक्षक अजूनही गोंधळलेले आहेत, मला वैयक्तिक अनुभवावरून हे माहित आहे.'

त्यामुळे आता मिर्झापूर सीझन 3 मध्ये प्रेक्षकांना पुन्हा ड्रामा सस्पेन्स आणि धमाकेदार अ‍ॅक्शन दिसणार आहे. यात काही शंकाच नाही मात्र अजूनही प्रेक्षकांना आशा आहे की मुन्नाचा मृत्यू झाला नसून तो पुन्हा या सिरिजमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे.

Mirzapur 3
Sherlyn Chopra Video: शर्लिन उर्फीच्या एक पाउल पुढं! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी काढले फॅशनचे धिंडवडे.....

ईशा नुकतीच होमी अदजानिया दिग्दर्शित 'सास बहू और फ्लेमिंगो' मध्ये दिसली होती. 'सास बहू और फ्लेमिंगो' मध्ये डिंपल कपाडिया देखील सावित्रीच्या भूमिकेत आहेत, जी ड्रग्स प्रकरणावर आधारित होती. या सिरिजलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते तिला मिर्झापुर 3 मध्ये पाहण्यासाठी उत्सूक आहेत.


मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग डिसेंबर 2022 मध्येच पूर्ण झाले आहे, ज्याची माहिती गुड्डू भैया फेम अली फजलने इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com