'अगं बाई मिस युनिव्हर्स ना तू?' एवढी कशी फुगलीस! हरनाजच्या वाढत्या वजनावर... | Miss Universe Harnaaz Kaur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu body shaming weight gain

Miss Universe Harnaaz Kaur : 'अगं बाई मिस युनिव्हर्स ना तू?' एवढी कशी फुगलीस! हरनाजच्या वाढत्या वजनावर...

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu body shaming weight gain : जगभरातील सौंदर्याच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणारा मिस युनिव्हर्सचा सोहळा काल पार पडला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या मिस युनिव्हर्स असणाऱ्या भारताच्या हरनाज संधून अमेरिकेची सौंदर्यवती आर बॉनी ग्रॅब्रियलच्या डोक्यावर मुकूट ठेवला. यासगळ्यात हरनाजवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

सोशल मीडियावर हरनाजचे ते फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या वर्षी मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाझला काय झालं आहे, तिचं वजन एवढं कसं वाढलं असा सवाल आता तिला नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. यावेळी शेवटचा रँप वॉक करताना हरनाझला अश्रू अनावर झाले होते.

Also Read - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

उपस्थित चाहत्यांनी तिचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं हे खरं, पण नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. मिस युनिव्हर्स होईपर्यत तू स्वताची चांगली काळजी घेत होतीस मग आता काय झाले, एवढी कशी काय तब्येत वाढली असा प्रश्न तिला नेटकरी विचारत आहे. हरनाझ मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसून येत आहे.

हेही वाचा: Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!

२०२१ मध्ये हरनाजनं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. देशाचे नाव वेगळ्या उंचीवर नेले होते. तिनं मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवला होता. प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्तानंतर असा खिताब मिळवणारी ती दुसरीच व्यक्ती होती. त्यामुळं तिचं सगळ्यांना कौतूकही होतं. आता ती तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे. हरनाझची फिगर चाहत्यांच्या टीकेचा विषय आहे.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

ट्रोलर्सनं एक गोष्ट नोटिस केली की, हरनाझनं वजन वाढवलं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर हरनाझला बॉडी शेमला सामोरं जावं लागलं आहे.