
आजचा दिवस विश्रांती आणि शांतता देणारा असावा असं चेल्सीने तिच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं.
वॉशिंग्टन - मिस USA २०१९ चा मुकुट जिंकणारी अमेरिकन मॉडेल चेल्सी क्रिस्ट हिच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. चेल्सी ही व्यवसायाने वकील होती. तिने ६० मजली इमारतीमधील २९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मिस युनिव्हर्स जिंकणाऱ्या हरनाझ कौर सिंधूची तिने बॅकस्टेज मुलाखतही घेतली होती.
चेल्सी क्रिस्ट ही ३० वर्षांची होती. तिने अमेरिकन प्रमाण वेळेनुसार सकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी मॅनहॅटनमध्ये आत्महत्या केली. ओरियन इमारतीत ती नवव्या मजल्यावर राहत होती. तर मृत्यूआधी चेल्सी २९ व्या मजल्यावर शेवटचं दिसली होती.
चेल्सीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिच्याजवळ सुसाइड नोट सापडलेली नाही. केवळ आपली संपत्ती आईच्या नावे करावी इतकंच तिने लिहून ठेवलं आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरु केला आहे. वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ इन विन्स्टटन सलेममधून तिनं शिक्षण घेतलं होतं. चेल्सी नॉर्थ आणि साउथ कॅरोलिनामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करत होती.
मानसिक आरोग्याबद्दल चेल्सी सातत्यानं सोशल मीडियावरून व्यक्त व्हायची. मृत्यूआधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्टही लिहिली होती. त्यात म्हटलं होतं की,'हा दिवस विश्रांती आणि शांतता घेऊन येवो.' मिस युएसए २०१९ जिंकल्यानंतर तिने एक्स्ट्रा नावाच्या शोमध्ये होस्ट म्हणून काम केलं होतं. चेल्सीच्या अचानक जाण्यानं तिच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.