‘मिसेस मुख्यमंत्री’ची सुमी अन् पायलटची ‘दिशाभूल’| Misses Mukhyamantri Marathi serial fame Amruta Ghongade Tejas Barve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Misses Mukhyamantri
‘मिसेस मुख्यमंत्री’ची सुमी अन् पायलटची ‘दिशाभूल’

‘मिसेस मुख्यमंत्री’ची सुमी अन् पायलटची ‘दिशाभूल’

टीव्ही मनोरंजन (Tv entertainment) क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली जोडी म्हणून मिसेस मुख्यमंत्री (Misses Mukhyamantri Marathi Serial) या मालिकेचं नाव घेता येईल. या मालिकेनं प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं. त्या मालिकेतील व्यक्तिरेखांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. ‘मिसेस मुख्यमंत्री’ (Misses Mukhyamantri) या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Ghongde) आणि ‘सुमी’ चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे (Tejas Barve) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 2022 या नव्या वर्षात अमृता धोंगडे आणि तेजस बर्वे यांची जोडी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर पेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ आहे.

सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ (Dishabhul) या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पुण्यात पार पडला. यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

हेही वाचा: 'कही ये वो तो नही' प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा Video Viral

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले की, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे. ‘दिशाभूल’ मध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. नवीन वर्षांची सुरुवात एका मराठी चित्रपटसह करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही अमृता आणि तेजस यांच्यासह मराठीतील नामवंत कलाकारांना एकत्र घेऊन एक वेगळा प्रयोग करत आहोत, त्याला प्रेक्षक साथ देतील असा विश्वास वाटतो.

हेही वाचा: Viral Video: कुत्र्याला घाबरुन 'जंगलाचा राजा' गेला पळून

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top