भाजपसाठी काम करत राहिल, अभिनेता मिथून चक्रवर्तींनी व्यक्त केली इच्छा

'पक्षाने माझ्यावर काही कामे सोपवली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल.'
Mithun Chakraborty News
Mithun Chakraborty Newsesakal

कोलकाता : गेल्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अभिनेता मिथून चक्रवर्ती भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. सोमवारी (ता.चार) त्यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी पक्षासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. गेल्या वर्षाच्या विधानसभा निवडणुकीनंतर अभिनेत्यापासून नेता बनलेले मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात आले आहेत. बाॅलीवूडची शान असलेले मिथून गेल्या वर्षी मार्च महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी ब्रिगेड परेड मैदानावरील एका मोठ्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. (Mithun Chakraborty Visit BJP Office In West Bengal And Say, I Will Work For Party)

Mithun Chakraborty News
'खतरो की खिलाडी'मधील स्पर्धकांची यंदा अग्निपरीक्षा, हिंसक प्राण्याशी...

मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. दुसरीकडे त्यांनी निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांनी भाजप (BJP) उमेदवारांसाठी पूर्ण राज्यात प्रचार केला होता. परंतु निवडणुकीनंतर चक्रवर्ती सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते. भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, माझी गेल्या वर्षीपासून तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मी राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाही. तसेच पक्ष कार्यालयातही येऊ शकलो नाही. पक्षाने माझ्यावर काही कामे सोपवली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. मी राज्यात पक्षासाठी काम करणार आहे. मी नेहमी वंचितांसाठी काम करु इच्छित होतो. त्या इच्छा पूर्ण करण्याचे व्यासपीठ भाजपने त्यांना दिल्याचे मिथून चक्रवर्ती म्हणाले.

Mithun Chakraborty News
जितके निर्लज्ज बनाल, तितके पुढे जाल; चित्रपट निर्मात्याची भाजपवर टीका

अगोदरच ते पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले आणि प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार आणि इतर वरिष्ठ भाजप नेत्यांबरोबर बैठक केली. राज्यातील भाजप सूत्रांनुसार, पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी चक्रवर्ती यांना सामील करुन घेणार आहे. पक्षाकडून जे काही मला सांगितले जाईल, ते मी करणार आणि कोणाला माहित २०१९ मध्ये १८ लोकसभा जागांची संख्या २०२४ मध्ये ३६ पर्यंत पोहोचू शकेल, असे मिथून चक्रवर्ती म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com