'मांजरेकरांवर 'सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो': मनसेचे अमेय खोपकर भडकले | MNS Ameya Khopkar Angry Mahesh manjrekar trolling reaction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movie Director Mahesh Manjrekar
'मांजरेकरांवर 'सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो': मनसेचे अमेय खोपकर भडकले

'मांजरेकरांवर 'सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो': मनसेचे अमेय खोपकर भडकले

मराठी - हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Movie Director Mahesh Manjrekar) हे सध्या त्यांच्या नव्या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. त्या चित्रपटाचं नाव वरण भात लोन्चा, कोण नाय कोन्चा (Marathi Movie) असं आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ट्रेलर व्हायरल (Varanbhat Loncha kon nai koncha Trailer) झाला होता. त्यामध्ये असलेल्या दृष्यांना सेन्सॉर बोर्डानं (Censor Board) आक्षेप घेतला होता. तसेच राज्य महिला आयोगानं देखील मांजरेकरांना पत्र पाठवून त्याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. काल मांजरेकर यांनी त्या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यं वगळणार असल्याचे सांगितले. तसेच पुढील दिवसांत त्या चित्रपटाचा नवा प्रोमो व्हायरल करणार असल्याचे सांगितलं आहे.

यासगळ्या प्रकरणावर मनसेचे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटाचा वाद समोर आला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते आहे. काल मांजरेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये त्यांनी 18 वर्षाखालील प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहू नये असे आवाहन केले होते. तसेच या चित्रपटाचा विषय जड असून ज्यांना त्यात जी मांडणी केली आहे ते पाहणे शक्य होईल त्यांनीच हा चित्रपट पाहावा असेही सांगितलं होतं.

हेही वाचा: Bollywood patriotic dialogues 'दुध मांगोगे तो खिर देंगे कश्मिर मागोंगे तो ...'

खोपकर यांनी आपल्या व्टिटमध्ये सांगितलं आहे की, नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्यात महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा मी अग्रक्रमाने निषेध करतो. महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाबद्दल जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा. पूर्वग्रहदूषित ‘सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो, आपला मेंदू किती सडलेला आहे हेच तुम्ही जगाला ओरडून सांगताय. मी चित्रपट बघून लवकरच पुन्हा बोलेनच…या शब्दांत खोपकर यांनी मांजरेकर यांच्यावर टीका करणाऱ्यांवर खोपकर भडकले आहेत.

हेही वाचा: Kiran Mane| अभिनेते किरण मानेंना सिरियलमधून काढलं ? राजकीय भूमिकांमुळे मालिका गमावली ? पाहा व्हिडीओ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top