अभिनेत्रीने मॉडर्न फॅमिलीच्या एका एपिसोडसाठी घेतले इतके कोटी; सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये अव्वल

sofia
sofia

वॉशिंग्टन - फोर्ब्सने यंदाच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मॉडर्न फॅमिली स्टार सोफिया वेरगारा ही पहिल्या क्रमांकावर आहे. वर्षभरात तिने 43 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 315 कोटी रुपये इतकी होते. तर दुसऱ्या क्रमांकारवर हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिचे नाव आहे. अँजेलिनाची वर्षाची कमाई 35.5 मिलियन डॉलर इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेली वंडर वूमन गॅल गॅडोट हिने 31.5 मिलियन डॉलर कमावले आहेत. 

वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सोफियाने याचे श्रेय मॉडर्न फॅमिलीला दिलं आहे. मॉडर्ना फॅमिलीच्या एका एपिसोडसाठी सोफिया 5 लाख डॉलर म्हणजेच जवळ जवळ 35 ते 36 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय रियालिटी शो अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये जज म्हणून सहभागी होणारी सोफिया प्रत्येक सिझनचे 10 मिलियन डॉलर घेते. मॉडर्न फॅमिली या शोला एमी अॅवॉर्डसुद्धा मिळाला आहे. तसंच 11 सिझननंतर यंदा एप्रिल महिन्यात हा शो संपला. 

फोर्ब्सच्या पहिल्या दहा सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये एकाही बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा समावेश नाही. चौथ्या क्रमांकावर मेलिसा मॅकार्थी तर पाचव्या क्रमांकावर मेरिल स्ट्रीप आहे. दोघींची कमाई अनुक्रमे 25 मिलियन आणि 24 मिलियन इतकी आहे.

सहाव्या क्रमांकावर एमिली ब्लंट असून तिचे वर्षभरातील एकत्रित मानधन 22.5 मिलियन इतकं आहे. या यादीमध्ये 22 मिलियन कमाई करणारी निकोल किडमॅन सातव्या स्थानावर तर 18 मिलियन मानधन घेणारी अॅलन पोम्पेओ आठव्या स्थानी आहे. एलिजाबेथ मॉस 16 मिलियन डॉलर कमाईसह नवव्या स्थानी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com