Mother's Day 2023: 'वजन वाढलं असलं तरी..', आईपण मिरवत समीरा रेड्डीनं केलं हटके फोटोशूट

समीरा रेड्डी अनेकदा भन्नाट व्हिडीओ शेअर करत चर्चेत येत असते.
Sameera Reddy Mothers Day Video
Sameera Reddy Mothers Day VideoEsakal

Mother's Day 2023: अभिनेत्री समीरा रेड्डीनं बॉलीवूडचा एक काळ गाजवलाय तो तिच्या सेक्सी फिगरमुळे आणि हॉट दिसण्यामुळे. समीरानं काही मोजकेच सिनेमे केले असले तरी तिच्या सौंदर्यामुळे ती लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. पण अलिकडे जर समीरा रेड्डीला पाहिलं तर फिगर आणि फिटनेसशी तिचा काडीचाही संबंध राहिलेला नाही हे प्रकर्षानं जाणवतं. पण तरिदेखील समीराचा आपला असा एक चाहता वर्ग आजही आहे.

दोन मुलांची आई बनल्यानंतर वाढलेल्या वजनाला देखील ज्या आत्मविश्वासानं समीरा कॅरी करते ते पाहून प्रत्येक स्त्रीला तिचा अभिमानच वाटला पाहिजे. नुकताच मदर्स डे निमित्तानं शेअर केलेल्या व्हिडीओत समीरानं यावर थेट भाष्य केलं आहे. चला जाणून घेऊया समीराच्या त्या मदर्स डे स्पेशल व्हिडीओविषयी.(Mother's Day 2023, Sameera Reddy Embraces Her Body; Says..)

Sameera Reddy Mothers Day Video
Twinkle Khanna: राजेश खन्ना सारख्या बड्या स्टारची मुलगी तरी अभिनेत्री बनण्याआधी मासे विकायची वेळ आलेली ट्विंकलवर..

समीरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. तिचे 'मेसी मम्मी..' अंतर्गत पोस्ट केलेले व्हिडीओ अगदी भारी असतात. तिच्या सासूसोबत मिळूनही ती मजेदार रिल्स शेअर करताना दिसते. तर तिच्या मुलांसोबतही ती अनेकदा भन्नाट रील शेअर करते. तिचं प्रेग्नेंसी दरम्यान केलेलं अंडरवॉटर फोटोशूट देखील खूप गाजलं होतं.

समीरानं मदर्स डे निमित्तानं यावर्षी देखील खास फोटोशूट केलं आहे. ज्यात तिनं बिनधास्त आपलं वाढलेलं वजन अन् फिगर फ्लॉन्ट केली आहे. या फोटोत कुठेही समीरानं आपलं वाढलेलं पोट लवपण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट हे फोटो शेअर करत समीरानं सर्व मम्मींना आपल्या वाढलेल्या वजनाचं टेन्शन न घेता आईपण सेलिब्रेट करण्याचा सल्ला दिला आहे.

Sameera Reddy Mothers Day Video
'Taarak Mehta..' च्या रोशन सोढीनं लैंगिक शोषण प्रकरणात शेअर केला व्हिडीओ.. निर्मात्याला आव्हान देत म्हणाली..

समीरानं व्हिडीओ सोबत काही कॅप्शन्स हायलाइट केलेयत,ज्यात ती म्हणतेय, ''माझं वाढलेलं वजन मी एन्जॉय करते...मला आजही मी सेक्सी दिसते..माझं शरीर बदललं तसा माझा अॅटिट्युडही''.

समीराचा हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांना आवडला आहे. अनेकांनी तिच्या या सकारात्मक दृष्टिकोनावर चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 'रेस','मुसाफिर','डरना मना है' सारख्या सिनेमांमुळे समीराला अधिक ओळख मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com