Twinkle Khanna: राजेश खन्ना सारख्या बड्या स्टारची मुलगी तरी अभिनेत्री बनण्याआधी मासे विकायची वेळ आलेली ट्विंकलवर..

ट्विंकलनं आपल्याच एका शो मध्ये अभिनेत्री बनण्याआधी ती मासे विकायची याचा खुलासा केला आहे.
Twinkle Khanna
Twinkle KhannaInstagram

Twinkle Khanna: अभिनेत्री ट्विंकल खन्ना आजच्या घडीला भले एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखली जाते पण कधीकाळी तिनं अभिनयातही आपलं नशीब आजमावलेलं,पण ती एक डिलिव्हरी गर्ल देखील होती बरं का.

ट्विंकल खन्नानं काही दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या नोकरीविषयी खुलासा केला होता. ट्विंकल म्हणाली होती ती कधी मासे तर कधी कोळंबी विकायची. तिला पाहून लोक विचारायचे,'तू मच्छिवाली आहेस का?'

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलनं याविषयी खुलासा केला तो आपलाच शो TweakIndia मध्ये. या शो मध्ये अभिनेते जॉनी लिव्हर देखील गेले होते. अक्षय कुमारनं देखील या शो मध्ये हजेरी लावली होती.

ट्विंकल खन्नानं जॉनी लिव्हरला विचारलं की,''कॉमेडियन बनण्याआधी त्यांनी आपल्या आयुष्यात कोणत्या कोणत्या नोकऱ्या केल्या आहेत?'' उत्तर देत जॉनी लिव्हरनं सांगितलं की त्यांनी रस्त्यावर उभं राहून पेन विकले होते. लोकांनी पेन खरेदी करायला हवेत म्हणून ते कलाकारांची मिमिक्री पेन विकताना करायचे.

Twinkle Khanna
Adipurush Starcast Fee: प्रभासपासून क्रिती, सैफपर्यंत सगळ्यांनीच 'आदिपुरुष' साठी घेतलंय तगडं मानधन..वाचा

यादरम्यान ट्विंकल खन्नानं आपल्या पहिल्या नोकरीविषयी देखील सांगितलं. ती म्हणाली,'' मला आठवतं की माझा पहिला जॉब मासे आणि कोळंबीची डिलिव्हरी करण्याचा होता. माझ्या आजीच्या बहिणीची फिश कंपनी होती. त्यांचे नाव मच्छीवाला असे आहे. जेव्हा मी यासंदर्भात कोणाला काही सांगायचे तेव्हा ते म्हणायचे,तू मच्छिवाली आहेस का?''

ट्विंकल खन्नानं सांगितलं की नंतर तिनं इंटीरियर डेकोरेटरचं शिक्षण घेतलं. तिला चार्टेड अकाउंटंट बनायचं होतं,त्या परिक्षेसाठी तिनं अर्ज देखील दाखल केला होता. पण त्यादरम्यान तिला सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या. तेव्हा आई डिंपल कपाडियानं ट्विंकलला म्हटलं की मुलींसाठी पैसे कमावण्याची हिच खरी वेळ आहे.

Twinkle Khanna
Mothers Day 2023: 2023 मध्ये 'या' अभिनेत्री बनणार 'आई'
Twinkle Khanna
Rutuja Bagwe: मालवणी चेडू चिलिंग इन मालवण...

डिंपलच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचं झालं तर ट्विंकल खन्नानं १९९५ मध्ये 'बरसात' सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'जब प्यार किसी से होता है', 'मेला', 'जोरू का गुलाम','बादशाह' सारख्या सिनेमात दिसली होती. त्यानंतर ट्विंकल खन्नानं २००१ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला रामराम ठोकला. आणि २०१५ पासून तिनं लेखन क्षेत्रात एन्ट्री केली,तिनं अनेक पुस्तकं लिहिली ज्यांची चर्चा चांगलीच रंगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com