Mother's Day :'आई'नं महेश मांजरेकरांचं नशीब पालटलं.. अजूनही त्या चित्रपटाची होते चर्चा..

आज मातृ दिनानिमित्त 'आई' चित्रपटाविषयी जाणून घेऊया खास बात..
mothers day 2023 special story mahesh manjrekar first movie aai released in 1995 cast
mothers day 2023 special story mahesh manjrekar first movie aai released in 1995 castsakal

mother's day special aai marathi movie: आजचा दिवस सर्वांसाठीच अगदी खास आहे. आज जागतिक मातृ दिन.. आजचा दिवस जगभरात 'मदर्स डे' म्हणून साजरा केला जातो. आपल्याला आईमुळे हे जग दिसतं, तिच्या संस्कारात आपण वाढतो त्यामुळे आईविषयी प्रत्येकालाच एक प्रचंड जिव्हाळ्याची भावना असते.

आजच्या दिवशी टेलिव्हिजन वर आवर्जून 'आई' या विषयावरी चित्रपट लावले जातात. त्यामध्ये एक चित्रपट हमखास लावला जातो आणि तो पाहिलाही जातो, तो म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'आई'.. हा चित्रपट..

आज मदर्स डे निमित्तानं जाणून घेऊया या खास चित्रपटाविषयी..

(mothers day 2023 special story mahesh manjrekar first movie aai released in 1995 cast)

mothers day 2023 special story mahesh manjrekar first movie aai released in 1995 cast
Sharad Ponkshe: हिंदू हा एकच धर्म; बाकी सगळे... इतर धर्मांवर शरद पोंक्षे आज स्पष्टच बोलले..

चित्रपट विश्वातही 'आई' या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले. पण महेश मांजरेकर यांचा 'आई' हा चित्रपट आजही अजरामर चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात अभिनेत्री निना कुलकर्णी, त्यांचे पती दिलीप कुलकर्णी, मिलिंद गवळी, सुनील बर्वे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सुलेखा तळवलकर अशी दमदार कास्ट होती.

विशेष म्हणजे 1995 साली प्रदर्शित झालेला 'आई' हा महेश मांजरेकर यांचा पहिलाच सिनेमा. या चित्रपटात एक आई मुलांसाठी काय करते यांचं दर्शन घडतं. सुरुवातीला नवऱ्यासाठी खंबीर पणे उभी राहणारी 'बाई' उतरती कळा लागलेलं घर स्वतः सावरते.

नवऱ्याच्या अपघाता नंतर ती स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करते आणि बघताबघता त्याचा वटवृक्ष होतो. आणि 'ती' मोठी उद्योजिका होते.

पण या सगळ्यात तिची मुलं तिला गृहीत धरतात आणि तिचा अपमान करतात. आपल्या पत्नीचं ऐकूं ते घर सोडतात आणि आई वडिलांना वाऱ्यावर टाकतात. तरीही 'आई' त्यांना पडद्यामागून पाठिंबा देत राहते. त्यांच्या नकळत त्यांना बळ देत असते.

पण जेव्हा ती स्वतःचा स्वाभिमान जपायला जाते तेव्हा मात्र तिच्या मुलांसहीत तिचा नवराही टिळा दोष देतो. तेव्हा मात्र ती खचते आणि निशब्द होते. एक आई आपल्या संसारासाठी काय करते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

निना कुलकर्णी या चित्रपटात आईच्या भूमिकेत होत्या तर सुनील बर्वे आणि मिलिंद गवळी मुलांच्या भूमिकेत होते. हा चित्रपट प्रचंड हिट झाला. या चित्रपटाने दमदार कमाई केलीच शिवाय लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. आजही या चित्रपटाचीक्रेझ कमी झालेली नाही. हा चित्रपट आवर्जून पहिलाच जातो.

या चित्रपटा नंतर महेश मांजरेकर यांची किमया सर्वांना कळली. त्यांना मोठं नाव मिळालं. त्यांच्या यशात आणि प्रसिद्धीत 'आई' या चित्रपटाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर 1998 मध्ये त्यांचा 'वास्तव' आला आणि महेश मांजरेकर हे नाव बॉलीवुडमध्येही गाजलं,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com