Mothers Day : 'कुणी असेल नसेल पण ती कायमच...': सिद्धार्थ शुक्लाची पोस्ट व्हायरल|Mothers day special Sidharth Shukla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mothers day special Sidharth Shukla

Mothers Day : 'कुणी असेल नसेल पण ती कायमच...': सिद्धार्थ शुक्लाची पोस्ट व्हायरल

Mothers Day 2022: मदर्स डे च्यानिमित्तानं टीव्ही मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. मात्र यासगळ्यात दिवंगत प्रसिद्ध अभिनेता (Tv Entertainment) सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या वर्षी हदयविकाराच्या धक्क्यानं सिद्धार्थचं निधन झालं होतं. त्याच्या अकाली जाण्यानं चाहत्यांना (Sidharth Shukla) मोठा धक्का बसला होता. कुटूंबियांना त्याचं जाणं चटका लावून जाणारं होतं. त्याची जीवलग मैत्रीण शहनाज गिलनं (Shehnaz gill) तर कित्येक दिवस अन्नपाणी वर्ज्य केलं होतं. मदर्स डे च्या निमित्तानं सिद्धार्थ शुक्लाची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याला (Bollywood News) नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मदर्स डे च्या निमित्तानं सिद्धार्थनं त्यावेळी एक खास पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये त्यानं आईविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यानं व्यक्त केलेल्या भावनांना नेटकऱ्यांनी भावूक होत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मदर्स डे औचित्यानं सिद्धार्थची ती पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. सिद्धार्थ मदर्स डे असल्यावर आईसाठी नेहमी वेगळं सेलिब्रेशन करत असे. त्याचं ते सोशल मीडीयावर व्हायरल होणं चाहत्यांना प्रेरित करणारं होतं. मात्र त्याच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. मदर्स डे असल्यावर आईला वेगवेगळ्या भेट वस्तू देणं हे सिद्धार्थला आवडायचे. 8 मे च्या दिवशी त्यानं अशीच एक पोस्ट केली होती. आज ती पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यानं आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थच्या आईचे नाव रिता शुक्ला असे आहे. त्यानं आईबद्दल लिहिताना म्हटलं आहे की, बाकी सगळेजण मला सोडून जातील पण आई कधीही माझ्यापासून दूर होणार नाही. बरोबर एक वर्षांपूर्वी सिद्धार्थनं ही पोस्ट सोशल मीडीयावरुन शेयर केली होती. तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस आणि राहशील. तूला आनंदी ठेवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेल. असं सिद्धार्थनं म्हटलं होतं.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थनं म्हटलं होतं की, माझ्यासाठी आईचं योगदान मोठं आहे. आईनं दिलेल्या शिकवणूकीचा मला नेहमीच उपयोग झाला आहे. ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. आईचं महत्व सांगण्यासाठी एक दिवसच नाही तर त्याविषयी नेहमी बोललं, लिहिलं गेलं पाहिजे. तिचे विचार मला जगण्यासाठी मदत करतात. तिच्याविना मी अपूर्ण असल्याचे सिद्धार्थनं म्हटलं होतं. बाकी कुणी माझ्यासोबत असो नसो पण माझी आई नेहमीच सोबत राहिल असा विश्वास मला आहे. असं सिद्रार्थनं म्हटलं आहे. गेल्यावर्षी 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थचं हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं.

हेही वाचा: Audience Review: मी वसंतराव - संघर्षाचा सांगीतिक प्रवास

Web Title: Mothers Day Special Sidharth Shukla Emotional Post Viral Social Media Always With Me

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top