Mother's day: आईसाठी सिद्धिविनायकाला पायी चालत गेला होता स्वप्निल जोशी.. असं काय घडलं होतं नेमकं?

'मातृ दिना'निमित्ताने वाचा हा खास किस्सा..
mothers day special swapnil joshi heart touching story  when his mother suffering from heart attack
mothers day special swapnil joshi heart touching story when his mother suffering from heart attack sakal

आजचा दिवस सर्वांसाठीच अगदी खास आहे. आज जागतिक मातृ दिन.. आजचा दिवस जगभरात 'मदर्स डे' म्हणून साजरा केला जातो. आपल्याला आईमुळे हे जग दिसतं, तिच्या संस्कारात आपण वाढतो त्यामुळे आईविषयी प्रत्येकालाच एक प्रचंड जिव्हाळ्याची भावना असते.

म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आईप्रती भावना व्यक्त करत असतो. यामध्ये मराठी कलाकारही अगदी आवर्जून आपल्या आईविषयी लिहीत असतात. फोटो शेयर करतात. पण असा एक कलाकार आहे जो, 'मी माझ्या आईसाठी काहीही करू शकतो..' असं कायम म्हणतो आणि करतोही..

तो अभिनेता आहे स्वप्नील जोशी. तो केवळ म्हणत नाही तर करूनही दाखवतो. त्याचं एक उत्तम उदाहरणही आहे. तोच भावनिक किस्सा आज मातृ दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया.

(mothers day special swapnil joshi heart touching story when his mother suffering from heart attack )

mothers day special swapnil joshi heart touching story  when his mother suffering from heart attack
Mother's Day :'आई'नं महेश मांजरेकरांचं नशीब पालटलं.. अजूनही त्या चित्रपटाची होते चर्चा..

स्वप्नीलचा त्याच्या आई बाबांवर प्रचंड जीव आहे. तो आजही कोणीतही गोष्ट त्यांना विचारल्या शिवाय करत नाही. अगदी त्याने गाडी कोणती घ्यावी हे देखील तो आई - बाबांना विचारून ठरवतो. त्याच्या मते, आई वडिलांचा आदर करण्या इतकं मोठं काम आयुष्यात कोणतंच नाही. आणि आपल्याला जे मिळतं टए त्यांच्याच आशीर्वादाने मिळतं.

त्यातही त्याची आणि त्याच्या आईची एक खास बॉंडिंग आहे. तो आईसोबत सगळ्या गोष्टी शेयर करतो. ती त्याची आईच नाही तर सगळ्याच जवळची मैत्रीण आहे. पण एक दिवस असा आला होता की त्याच्या आईचा जीव धोक्यात होता आणि या विचाराने स्वप्नील कासावीस झाला. यावेळी त्याने जे केलं ते ऐकून त्याच्या आईला आजही त्याचा अभिमान वाटतो.

एका मुलाखतीत स्वप्नीलची आई म्हणाली, ''मला २००६ साली हार्ट अटॅक आला होता. तेव्हा माझी आई ठणठणीत होऊ दे म्हणून स्वप्नीलने सिद्धिविनायकाकडे साकडं घातलं होतं. ज्यादिवशी माझं ऑपरेशन होतं त्यादिवशी सकाळी तो पायी चालत सिद्धिविनायकाला गेला होता.'

पुढे त्या म्हणाल्या, ''एवढंच नाही तर आई बरी झाली तर गिरगाव पासून सिद्धिविनायकापर्यंत दर्शन घेण्यासाठी 11 वेळा चालत येईन, असा नवस त्याने केला होता,' असा किस्सा त्याच्या आईने सांगितला होता. किंबहुना हा प्रसंग आठवला की कायमच स्वप्नील आणि त्याची आई यांच्या डोळ्यातून आपसूक पाणी येतं आणि ते भावुक होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com