Mouni Roy Birthday: 'नागिन'पासून 'जुनून'पर्यंतची मौनीची बोल्ड जर्नी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mouni Roy

Mouni Roy Birthday: 'नागिन'पासून 'जुनून'पर्यंतची मौनीची बोल्ड जर्नी

'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून तर ब्लॅाकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' पर्यन्त असा लांबचा पल्ला गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर तिची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मौनी रॉय आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 सप्टेंबर 1985 रोजी कूचबिहारमध्ये ती जन्मली .

हेही वाचा: Mouni Roy: आई होण्याविषयी मौनीचा मोठा खुलासा; म्हणाली,'लग्नाला ८ महिने झालेयत आणि..'

सेंट्रल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिने मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. मौनीने जामिया मिलिया इस्लामियामध्ये मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला होता. पण मौनी रॉयला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने मास कम्युनिकेशनचे शिक्षण मधेच सोडले आणि ती मुंबईला आली.मौनीला आधीपासूनच अभिनेत्री बनायचं होत. अभिनयाचा वारसा तिला आपल्या घरातूनच मिळाला आहे. मौनीचे आजोबा शेखर चंद्र रॉय आणि आई मुक्ती हे प्रसिद्ध थिएटर कलाकार आहेत.

मौनी रॉय पहिल्यांदा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांच्या 'रन' चित्रपटातील एका गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली होती.मौनीने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये लोकप्रिय टीव्ही शो 'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून केली. त्यानंतर ती कस्तुरी, देवों के देव महादेव, , 'नागिन', 'कस्तूरी', 'जुनून', 'ऐसी नफरत तो कैसा इश्क' अशा अनेक मालिंकामधुन ती घराघरात प्रसिद्ध झाली. 'देवों के देव महादेव'मधील मौनीच्या सतीच्या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली. पण खरी ओळख तिला 'नागिन' नतंर मिळाली.

हेही वाचा: Navratri 2022:Bollywood च्या लाल रंगातील या लालपऱ्या एकदा पहाच...

ती 2011 मध्ये पंजाबी चित्रपट 'हिरो हिटलर इन लव्ह'मध्ये त्यानंतर 2018 मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली.त्यानंतर 'रोमियो अकबर वॉल्टर', 'मेड इन चायना' आणि 'लंडन कॉन्फिडेन्शियल'मध्ये ती होती. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'जुनून' या दमदार भूमिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.