Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळींच्या 'लवस्टोरी'त दिसणार बॉलीवूडमधील 'ही' जोडी! कुणाला मिळाली संधी?

भन्साळी यांच्या आगामी लवस्टोरी चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.
Sanjay Leela Bhansali
Sanjay Leela Bhansaliesakal

Sanjay Leela Bhansali : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे नेहमीच त्यांच्या आगळ्या वेगळ्या कलाकृतीसाठी ओळखले गेले आहेत. सेटवरील भव्यता, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन यासाठी भन्साळी यांच्या चित्रपटांना मिळणारा चाहतावर्गही मोठा असल्याचे दिसून आले आहे. अशातच त्यांच्या एका आगामी लवस्टोरी चित्रपटाची चर्चा दिसून येत आहे.

भन्साळी यांनी आतापर्यत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना इंट्रोड्युस केलं आहे. त्यात नावं सांगायची झाल्यास अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), सोनम कपूर (Sonam Kapoor) यांची नावं सांगता येतील. आता बॉलीवूडमधील आणखी एक स्टार जोडी ही लवकरच त्यांच्या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इंडिया डॉट कॉमनं त्याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

भन्साळी यांच्या ब्लॅक (Black Movie On Netflix) या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भन्साळी यांच्या आगामी काही प्रोजेक्टसची चर्चा सुरु झाली आहे. त्यात त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत हिरामंडी नावाचा चित्रपटही आहे.

Sanjay Leela Bhansali
Ranbir Kapoor : 'कामाचे तास फिक्स पाहिजे, सेटवर शिस्त हवी अन्...' भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीरच्या काय आहेत अटी?

आता बॉलीवूडमधील हिट जोडी सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची (Mrunal Thakur And Siddhant Chaturvedi) भन्साळी यांच्या आगामी लवस्टोरीमध्ये वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या दोघांचा हा भन्साळी यांच्यासोबत पहिलाच प्रोजेक्ट असणार असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी भन्साळी यांनी विकी कौशल, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या सोबतच्या लव अँड वॉर या प्रोजेक्टची घोषणा केल्याचे दिसून आले आहे. तसेच हिरामंडी ही सीरिजदेखील यंदाच्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sanjay Leela Bhansali
Kangana Ranaut: "मला कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा..."; अॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगना थेटच म्हणाली, पण नेमकं कारण काय?

पीपिंगमुन डॉटकॉमच्या माहितीनुसार सिद्धांत आणि मृणाल हे भन्साळी यांच्या आगामी प्रोजेक्टचा भाग होऊ शकतात. अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेलं नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उदयवार करणार असल्याचेही बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com