Naseeruddin Shah: मुघल वाईट नव्हते उलट त्यांनी भारतासाठी... नसिरुद्दीन शाहांनी घेतली मुघलांची बाजू

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह सम्राट अकबराची भूमिका साकारणार आहेत
Naseeruddin Shah, Taj: Divided by Blood
Naseeruddin Shah, Taj: Divided by Blood SAKAL

Naseeruddin Shah News: ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ (Taj: Divided by Blood) या वेबसिरीजची सध्या खूप चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह या वेबसिरीजमध्ये सम्राट अकबराची भूमिका साकारणार आहेत.

या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली वेबसिरीज काहीशी बोल्ड धाटणीची आहे. नसिरुद्दीन शाह सम्राट अकबराच्या भूमिकेत आजवर कधीही न पाहिलेल्या वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.

(Mughals were not bad Nasiruddin Shah took side of mughals)

Naseeruddin Shah, Taj: Divided by Blood
Selfiee Release: फ्लॉप कुमार झालाय तू.. लोकप्रिय समीक्षक KRK ने वाचला अक्षयच्या फ्लॉप सिनेमांचा पाढा

‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ या वेबसिरीज निमित्ताने नसिरुद्दीन शाह यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला. त्यावेळी बोलताना नासिरुद्दीन शाह यांनी मुघलांची बाजू घेतली..

नसिरुद्दीन म्हणतात, “हे खूप हास्यास्पद आहे. म्हणजे, लोक अकबर आणि नादर शाह किंवा बाबरचा आजोबा तैमूर सारख्या खुनी आक्रमणकर्त्यांमध्ये फरक सांगू शकत नाहीत. हे लोक इथे लुटायला आले होते असं म्हटलं जातं.

पण मुघल इथे लुटायला आले नव्हते. मुघल त्यांचे घर बनवण्यासाठी येथे आले आणि त्यांनी तेच केले. मुघलांचं योगदान कोण नाकारू शकेल?"

नसिरुद्दीन पुढे म्हणतात.. ते म्हणाले की काही मुघल आक्रमक होते, याचा अर्थ असा नाही की आपण त्या सर्वांना खलनायक बनवायला हवे. म्हणून लोक जे म्हणत आहेत ते काही प्रमाणात खरे आहे, की आपल्या स्वदेशी परंपरांवर मुघलांनी घाला घातला.

कदाचित ते खरे असेल, पण त्यांना खलनायक बनवण्याची गरज नाही. जर मुघलांनी सर्वकाही भयंकर केले आहे तर मग ताजमहाल पाडा, लाल किल्ला पाडा, कुतुबमिनार पाडा.

लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, तो मुघलांनी बांधला होता. अशा गोष्टींचा वेगळा गौरव करण्याची गरज नाही परंतु अशा गोष्टींचा अपमान सुद्धा करू नये."

Naseeruddin Shah, Taj: Divided by Blood
Mrs Chatterjee Vs Norway Real Story: या भारतीय कुटुंबासोबत १२ वर्षांपूर्वी घडलेली धक्कादायक घटना नेमकी काय? जाणुन घ्या

ताज डिवाइड बाय ब्लडमध्ये आशिम गुलाटी यांनी प्रिन्स सलीम, अदिती राव हैदरी अनारकलीच्या भूमिकेत, संध्या मृदुल राणी जोधाबाईच्या भूमिकेत आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र शेख सलीमच्या भूमिकेत आहेत.

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे बिरबलाची भूमिका साकारत आहे. Zee5 वर या वेबसिरीजचा प्रीमियर ३ मार्चला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com