रावण को दयालु बनाने का खेल क्यों भाई ?

 mukesh khanna comment on adipursuh actor saif ali khan played ravan character said ravan humane
mukesh khanna comment on adipursuh actor saif ali khan played ravan character said ravan humane

मुंबई - अभिनेता सैफ अली खान हा आता वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्याने आदिपुरुष नावाचा चित्रपट साईन करुन चूक केली की काय असा प्रश्न बहुधा त्याला पडला असावा. गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याच्यावर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, संघटनांनी, काही संस्थांनी विरोध केला आहे, विशेष म्हणजे सैफनं माफी मागून  त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचेही दिसून आले आहे. 

शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी सैफवर कडाडून टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या आरोप प्रत्यारोपानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रावणाला चित्रपटातून एक सर्वसामान्य माणूस अशा भूमिकेतून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सैफनं सांगितले होते. त्यामुळे त्याला वादाला सामोरे जावे लागले होते.

मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर असे लिहिले आहे की, सनातनी धर्म आणि त्याच्यावर टीका करण्यात धन्यता मानणा-यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. रावणाला दयाळु दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून दाखविण्याच प्रयत्न करण्यात आला आहे. पण मला यावर एक सांगायचे आहे ते म्हणजे 'रावण को दयालु बनाने का खेल क्यों भई ? क्या इसमें भी कोई साज़िश है ?

चित्रपटाच्या प्रमोशनचा तर हा भाग नाही ना, याचा विचार करावा लागेल, सगळ्यात महत्वाचे यासाठी धर्माला का बदनाम केले जात आहे. दिग्दर्शक आणि त्यातील कलाकारांना याच्याशी काही देणे घेणे नाही असे दिसते आहे. अशाप्रकारचे चित्रपटट प्रदर्शित करण्याचे धाडस ते कसे काय दाखवतात कुणास ठाऊक. राम जसे रावण होऊ शकत नाही त्याप्रमाणे रावणही राम होऊ शकत नाही. याविषयी मला काही सांगायचं नाही. प्रेक्षकांनी बरे वाईट ठरवायला हवे. असेही खन्ना यांनी यावेळी सांगितले.

“रावणाला आजवर आपण केवळ खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार. असे सैफ म्हणाला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com