Mukesh Khanna: म्हणून 'आदाब' म्हणणाऱ्यांचा राग! का होतेय शक्तिमानची चिडचिड?

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी बॉलीवू़डमधील काही अभिनेत्यांवर आपला राग व्यक्त केला आहे.
Shaktiman fame mukesh khanna news
Shaktiman fame mukesh khanna news eskal

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी बॉलीवू़डमधील काही अभिनेत्यांवर आपला राग व्यक्त केला आहे. ते (social media viral news) अभिनेते करत असलेल्या जाहिराती आणि त्यातून दिला जाणारा संदेश यामुळे आपण नेमकं काय देतो आहोत. असा प्रश्न खन्ना यांनी (bollywood trending news) यावेळी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. त्यांच्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

त्या व्हिडिओवरुन शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी अजय देवगण, शाहरुख आणि अक्षय कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. जेव्हा कुणी तुम्हाला अशाप्रकारे आदाब म्हणतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं? आदाब आणि प्रणाम म्हटल्यावर कुणाला राग येईल का, पण त्या सेलिब्रेटींच्या वागण्यामुळे तसे झाले आहे. हे आपण लक्षात घ्यायला तयार नाही. मला आदाब करणाऱ्यांचा राग येतो. तुम्हाला वाटेल मला त्यांचा राग का आहे, मला अशा आदाबचा राग आहे जे बॉलीवू़डमधील सो कॉल्ड कलाकार नेहमीच जाहिरातीच्या दरम्यान करत असतात.

Shaktiman fame mukesh khanna news
ग्लोबल बाप्पा : न्यूयॉर्क ते दुबई; गणेशोत्सवाचे व गौरी पूजनाचे मुहूर्त

एक दोन नाहीतर तीन अभिनेते जे बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत त्यांनी अशाप्रकारच्या जाहिराती करतात तेव्हा त्यांना काय म्हणावे असा प्रश्न मला पडतो. बोलो जुबा केसरी मधून काय सांगण्याचा प्रयत्न ते करतात. अजयची चांगले अभिनेते आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. जेव्हा त्यांनी अशाप्रकारची जाहिरात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला तर मोठा धक्काच बसला. मला राग तेव्हा आला जेव्हा शाहरुख खाननं ही जाहिरात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फिटनेस फ्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयनं त्याचीच री ओढली.

Shaktiman fame mukesh khanna news
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

मुकेश यांनी म्हटलं आहे की, अक्षय कुमार जेव्हा त्या पानमसाल्याची जाहिरात करतो तेव्हा मला काय बोलावं कळत नाही. त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. दुसरे सेलिब्रेटी अजुनही ती जाहिरात करत आहे. त्यांना त्या पानमसाल्याच्या जाहिरातीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी मी वाचले की, कार्तिक आर्यननं त्या पानमसाल्याची जाहिरात करण्यास नकार दिला. त्याला तर नऊ कोटींची ऑफर करण्यात आली होती. ते ऐकल्यानंतर मला बरे वाटले होते. अशी प्रतिक्रिया खन्ना यांनी दिली होती.

Shaktiman fame mukesh khanna news
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com