esakal | प्रविण तरडेचा मनसेच्या दहीहंडीला पाठिंबा, म्हणाला '१०० टक्के नाचायला येणार'
sakal

बोलून बातमी शोधा

pravin tarde raj thackeray

प्रविण तरडेचा मनसेच्या दहीहंडीला पाठिंबा, म्हणाला '१०० टक्के नाचायला येणार'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोना महामारीचं संकट असल्यामुळे सर्व सण आणि उत्सवांवर बंधनं आली आहेत. मात्र या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं MNS कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे Abhijeet Panse यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबतची घोषणा केली. ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं पानसे यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यात त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचंही नाव नमूद केलं आहे. मनसेच्या या दहीहंडीला 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडेनं Pravin Tarde पाठिंबा दिला आहे. '१०० टक्के नाचायला येणार' अशी कमेंट तरडेने या पोस्टवर केली आहे. (mulshi pattern fame pravin tarde support to mns dahi handi slv92)

'कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी उत्सव साजरा करा', असं आवाहन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून मनसेकडून ही दहीहंडी साजरी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी दहीहंडीच्या विविध पथकांनाही आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा: फक्त सलमानसोबत चांगलं नातं निर्माण करण्यासाठी 'राधे' केला- प्रवीण तरडे

मनसेनं दहीहंडी उत्सवासाठी घेतलेल्या या भूमिकेची सध्या चर्चा रंगली आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द करण्यात आली होती. पण आता यावर्षी मनसेच्या या भूमिकेवर राज्य सरकार आणि पोलीस काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

loading image