फक्त सलमानसोबत चांगलं नातं निर्माण करण्यासाठी 'राधे' केला- प्रवीण तरडे

"राधे चित्रपट पाहिल्यानंतर माझे चाहते नाराज झाले."
pravin-tarde
pravin-tarde

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेनं Pravin Tarde सलमान खानच्या Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai या चित्रपटात भूमिका साकारली. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर चाहते निराश झाल्याचं तरडेनं सांगितलं. हा चित्रपट फक्त सलमानसोबत एक चांगलं नातं निर्माण करण्यासाठी केल्याचंही त्याने स्पष्ट केलं. 'राधे'मध्ये प्रवीण तरडेने दगडू दादा या गुंडाची भूमिका साकारली. (Pravin Tarde reveals he did film radhe to build relations with Salman Khan)

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाचा दिग्दर्शक प्रवीणने याआधी काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं. नागराज मंजुळेंच्या 'फँड्री'मध्येही त्याने भूमिका साकारली होती. आता सलमान खान 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. या चित्रपटाचं नाव 'अंतिम : द फायनल ट्रुथ' असं असून महेश मांजरेकर त्याचं दिग्दर्शन करणार आहेत.

'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण म्हणाला, "राधे चित्रपट पाहिल्यानंतर माझे चाहते नाराज झाले. ते म्हणाले, 'प्रवीण दादा, इतकी छोटी भूमिका का केली?' मी म्हटलं, अशा छोट्या भूमिका साकारूनच मी इथपर्यंत आलोय. भूमिका किती लहान किंवा मोठी आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. पण त्यात माझी कामगिरी कशी आहे हे महत्त्वाचं आहे. सलमान भाईसोबत मला चांगलं नातं निर्माण करायचं होतं आणि त्याच्यासोबत काम करायचा अनुभव खूपच चांगला होता. एक माणूस म्हणून मला तो आवडला."

pravin-tarde
सलीम खान यांनाच आवडला नाही सलमानचा 'राधे'; म्हणाले..

मसाला चित्रपट पाहायला आणि त्यात काम करायला आवडत नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. "समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी चित्रपट हे उत्तम माध्यम आहे, असं मला वाटतं. चित्रपटातून जर एखादी समस्या मांडली गेली, तर त्याहून उत्तम काहीच होऊ शकत नाही. कथानकाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट खूपच चांगले आहेत", असं तो पुढे म्हणाला.

प्रवीण तरडेचा 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com