ए आर रेहमानच्या कान्सर्टमध्ये गर्दीमुळं गोंधळ! प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मिळणार

घडलेल्या प्रकारबद्दल एआर रेहमाननं मागितली माफी, प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे मिळणार रिफंड
AR Rahman big revelation about the industry Singer
AR Rahman big revelation about the industry Singeresakal

AR Rahman Chennai Concert:नुकताचं जगविख्यात संगीतकार एआर रहमान यांचा चेन्नईच्या पनियारमध्ये 'मरकुमा नेंजम'हा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बघायला आलेल्या काही प्रेक्षकांनी चेंगराचेंगरी सारख्या परिस्थितीमुळे व्यवस्थापकांविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती.

एका प्रेक्षकाने तर या कॉन्सर्टचं तिकीट फाडून हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. अनेक प्रेक्षकांच्या नाराजीनंतर एआऱ रहमानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने तिकीटाचे पैसे रिफंड मिळतील, असे आश्वासनही दिले.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, चाहत्यांच्या नाराजीनंतर एआऱ रहमानने त्याच्या चेन्नईमधील कॉन्सर्टच्या तिकीटाचे पैसे परत केले जाणार असल्याची घोषणा केली. ढिसाळ व्यवस्थापनाचे पडसाद समाज माध्यमांवर उमटल्यानंतर एसीटीसी इवेंट्सने घडलेल्या प्रकारबद्दल माफीही मागितली.

एआर रहमान ट्वीट करत म्हणाला की, "ज्या लोकांना गर्दीमुळे कार्यक्रमात अडचणी आल्या,त्यांनी कृपया आपल्या तिकीटाची कॉपी तुमच्या तक्रारीसह मला पाठवा. माझी टीम तुम्हाला प्रतिक्रिया देईल."(Latest Marathi News)

AR Rahman big revelation about the industry Singer
IND Vs PAK Live Score: राखीव दिवशी पाकिस्तान आलं रडकुंडीला; विराट - राहुलनं चांगलंच चोपलं

या कार्यक्रमाच्या आयोजनावर प्रेक्षकांनी ताशेरे ओढले होते. एआर रहमान यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, ती जागा अत्यंत छोटी होती. त्यामुळे गर्दी जास्त झाल्यावर चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. काही लोकांनी तिकीट काढली होती. मात्र, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे काही लोकांना तिकीट असूनही आत शिरता आलं नाही. कार्यक्रमात आवाजाचा देखील ताळमेळ लागत नव्हता, स्टेजच्या ठराविक भागातचं कार्यक्रमाचा चांगला आवाज यायचा, असे काही प्रेक्षकांनी सांगितले.

प्रसिद्ध फिल्म ट्रेड अ‍ॅनलिस्ट मनोबाला विजयबालन यांनी ट्विट करत कार्यक्रमाचा अनुभव सांगत नाराजी व्यक्त केली. त्यांनी एआर रहमान यांच्या कान्सर्टची तिकीट फाडताना व्हिडीओ काढला आणि हा व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करत आपली नाराजी नोंदवली.(Latest Marathi News)

AR Rahman big revelation about the industry Singer
Ind vs Pak Asia Cup 2023 : 'मी बोललो होतो केएलच्या सासरेबुवांना एकदा जाऊया स्वामी नारायण मंदिरात!' आता घडलंय काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com