आम्हाला स्वीकारण्यात 'जात' आड आली ; नवाझुद्दिन सिध्दिकीची सल  

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

देशातल्या अनेक राज्यांतील शहरांमध्ये जातीचे भयानक अनुभव लोकांना येत असतात.नवाझुद्दिन हा उत्तर प्रदेशातील एका गावचा असल्याने त्याला तेथील सामाजिक विषमता, जात भेदभाव याची चांगलीच कल्पना आहे. तो म्हणतो छोट्या गावांमध्ये अजूनही जातीच्या भिंती विकासाच्या आड येत आहेत.

मुंबई- भारतातील अनेक रा़ज्यांमध्ये जातीचे चटके सहन करत अपमानजनक आयुष्य जगणा-यांची संख्या प्रचंड आहे. एकविसाव्या शतकात देशातील जातवास्तव अधिक भयानक होत असल्याच्या बातम्या रोज वाचायला मिळतात. प्रख्यात अभिनेता नवाझुद्दिन सिध्दिकीने आपल्याला आलेला जातीचा विदारक अनुभव सोशल माध्यमांवर व्यक्त केला आहे. 

नवाझुद्दिन सांगतो, आपल्या देशात जे जीवघेणे जातवास्तव आहे त्याचा त्रास मलाही जाणवला आहे. माझी आजी ही खालच्या जातीची होती. अजूनही आम्हाला म्हणावे असे कुणी स्वीकारले नाही. हे सांगावेसे वाटते. एनडीटीव्हीला वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाझुद्दिन सिध्दिकीने आपल्याला आलेले जात अनुभव कथन केले आहे. नुकताच नवाझुद्दिनचा सिरीयस मॅन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहेय त्यात अद्यापही भारतातल्या सर्वसामान्य माणसांना येणा-या जातीच्या अनुभवाचे विदारक चित्रण केले आहे. देशाच्या सामाजिक आणि नैतिक मुल्यांना काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली. त्यावर सिध्दिकीने आपले मत व्यक्त केले आहे.

ख्रिस्तोफर नोलानच्या ''टेनेट'' चित्रपटाने केला धूर; कोरोनातही ठरला ''सुपरहिट''

देशातल्या अनेक राज्यांतील शहरांमध्ये जातीचे भयानक अनुभव लोकांना येत असतात. नवाझुद्दिन हा उत्तर प्रदेशातील एका गावचा असल्याने त्याला तेथील सामाजिक विषमता, जात भेदभाव याची चांगलीच कल्पना आहे. तो म्हणतो छोट्या गावांमध्ये अजूनही जातीच्या भिंती विकासाच्या आड येत आहेत. जातीवरुन भेदभाव सुरुच आहे. याचे प्रतिकूल परिणाम त्या मानवी व्यवस्थेवर होत आहे. हाथरस येथे घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. एका दलित कुटूंबातील मुलीवर झालेला अत्याचार तिची करण्यात आलेली हत्या हे सारं सुन्न करणारं आहे.

अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांनी केलं लग्न? सोशल मिडियावर व्हायरल फोटोंमुळे चर्चा

बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांनी हाथरसच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. जे चूकीचे घडले त्याला चूक म्हटले जायला हवे. त्यामुळे सर्वांनी त्याचा निषेध केला. अनेकजण म्हणतात आता जात व्यवस्था, जात भेदभाव संपला आहे. अशा लोकांनी जरा  इतर भागांमध्ये काय वास्तव आहे याची फिरुन  माहिती घ्यावी. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे हे त्यांना सांगायला हवे. असे नवाझुद्दिनने सोशल माध्यमातून सांगितले आहे.

अक्षयच्या ''लक्ष्मी बॉम्ब'' चा फाडू ट्रेलर पाहिलायं ? ; मग एकदा बघाच
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my grandmother was from a lower caste Even today they have not accepted us