N D Mahanor: "पावसाळ्यातच वृक्ष उन्मळून पडला..."; महानोरांच्या आठवणींनी शरद पवार भावूक

महानोर यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक श्रेष्ठ निसर्ग कवी आणि संवेदनशील साहित्यिक गमावला आहे.
Mahanor_Sharad Pawar
Mahanor_Sharad Pawar

मुंबई : ना. धों. महानोर यांच्या निधानानं महाराष्ट्रानं मोठा साहित्यिक आणि कवी गमावला आहे. त्यामुळं विविध क्षेत्रातून त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया येत आहेत. ज्येष्ठ नेते आणि महानोर यांचे निकटवर्तीय मित्र असलेले शरद पवार यांनी देखील सोशल मीडियावर दीर्घ पोस्ट लिहित त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका रानकवीचं पावसाळ्यातच निधनं व्हावं, हा योग मनाला चटका लावणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (N D Mahanor Sharad Pawar is emotional with memories write a log post)

Mahanor_Sharad Pawar
Mantralay News: मंत्रालयात फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तरुणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानं खळबळ!

शरद पवारांची भावनिक पोस्ट

पवार म्हणतात, "माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झालं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. याचं बालपण कष्टात गेलं पण कष्ट झेलताना त्यांचं संवेदनशील मन रानात रमलं. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धो. यांच्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केलं. (Latest Marathi News)

Mahanor_Sharad Pawar
ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांचं निधन; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

वृक्ष उन्मळून पडला

ना. धों. ची विधान परिषदेतील भाषणं देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत असतं. ते खूपच हळवे होते, पत्नीच्या निधनानं ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चं निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांतर्फे या मृदू मनाच्या निसर्गकवीला श्रद्धांजली अर्पण करतो" (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com