'देवाची इच्छा असेल तर...', घटस्फोटानंतर नागाचैतन्य समंथाविषयी अखेर बोललाच Samantha Ruth Prabhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naga Chaitanya opens up on Samantha Ruth Prabhu

'देवाची इच्छा असेल तर...', घटस्फोटानंतर नागाचैतन्य समंथाविषयी अखेर बोललाच

समंथा रुथ प्रभूनं(Samantha Ruth Prabhu) आपल्या करिअरची सुरुवात ही नागा चैतन्यसोबतच(Naga Chaitanya) केली होती,अर्थात तेव्हा दोघांनाही आपल्या आयुष्यात पुढे काय-काय घडणार आहे,आपण कसे,कोणत्या गोष्टीसाठी जोडले जाऊ याची काहीच कल्पना नव्हती. २०१४ मध्ये दोघं पुन्हा एकत्र सिनेमात दिसले आणि तिथुनच त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये लग्नाचा निर्णय घेतला . पण हे लग्न ४ वर्ष देखील टिकलं नाही.(Naga Chaitanya opens up on Samantha Ruth Prabhu)

हेही वाचा: Tejasswi-करणला बर्थ डे पार्टी पडली महाग, दोघांचा लीपलॉक व्हिडीओ लीक

दोघांनी आपापसातील सहमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दोघंही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. पण जेव्हा जेव्हा समंथाचा विषय निघेल तेव्हा तेव्हा नागा चैतन्यचे नाव समोर येणार हे ठरलेलं. नुकत्याच एका मुलाखतीत नागा चैतन्यने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी विषयी म्हणजेच समंथाविषयी विचारलेल्या प्रश्नावर थेट उत्तर देऊन चुप्पी तोडली आहे.

हेही वाचा: Mumtaz चा 75 व्या वाढदिवशी शम्मी कपूर यांच्याविषयी मोठा खुलासा; म्हणाल्या...

समंथासोबत भविष्यात काम करण्याविषयी नागा चैतन्यला प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यानं खूप सकारात्मक विचार मांडत म्हटलं, ''जर असं झालं तर हे उत्तमच असेल. माहित नाही असं होईल की नाही, हे फक्त देवालाच ठाऊक,त्याची इच्छा असेल तर तेही घडेल''.

हेही वाचा: Malaika आणि अर्जुन मध्ये बिनसलं? व्हायरल व्हिडीओनं रंगली चर्चा

दोघांचा घटस्फोट का झाला याविषयी कोणताच खुलासा समोर आलेला नाही,ना त्या दोघांनीही यावर कधी भाष्य केलं. पण यांचा घटस्फोट सगळ्यांनाच हैराण करणारा होता.

हेही वाचा: 'जो स्त्रीचा अपमान करेल...'; संजय राऊतांवरील कंगनाचं वक्तव्य Viral

दक्षिणेत आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्यानंतर नागा चैतन्य आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. लवकरच तो आमिरच्या लाल सिंग चड्ढा सिनेमातून आपल्याला दिसेल. या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ११ ऑगस्टला सिनेमा रिलीज होत आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या रक्षाबंधन सिनेमाशी आमिरच्या लाल सिंग चड्ढाची टक्कर असणार आहे. यामुळे सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगली आहे, आमिर की अक्षय कोण भारी ठरणार बॉक्सऑफिसवर?

Web Title: Naga Chaitanya Opens Up On Samantha Ruth Prabhu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top