Tejasswi-करण 'त्या' अवस्थेत कॅमेऱ्यात झाले कैद, लीक झाला प्रायव्हेट व्हिडीओ

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश म्हणजे छोट्या पडद्यावरचं सगळ्यात हॉट आणि प्रसिद्ध कपल असल्यानं दोघंही नेहमीच चर्चेत पहायला मिळतात.
Tejasswi and Karan’s lip lock video leaked
Tejasswi and Karan’s lip lock video leakedGoogle

करण कुंद्रा(Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) म्हणजे छोट्या पडद्यावरचं सगळ्यात हॉट आणि प्रसिद्ध कपल. नेहमीच चर्चेत असणाऱ्या या कपलला आजकाल बऱ्याच ठिकाणी एकत्र स्पॉट केलं जातं. यांच्यामधील क्यूट बॉन्डिंग पहायला त्यांचे चाहते देखील आतुर झालेले पहायला मिळतात. सोशल मीडियावर देखील आपल्या रिलेशनशीप्स गोल्सवरनं अनेकदा ते चर्चेचा विषय बनताना दिसतात. त्यातच आता पुन्हा एकदा या कपलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे,तो पाहून इंटरनेटचा पारा मात्र चढला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्वी आणि करण लीपलॉक करताना दिसत आहेत.(Tejasswi and Karan’s lip lock video leaked, internet devastation as soon as it went viral)

Tejasswi and Karan’s lip lock video leaked
...तर आमिर नाही त्याचा मुलगा जुनैदने साकारला असता लाल सिंग चड्ढा, पण...

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत पहायला मिळत आहेत. चाहत्यांना यांची जोडी भलतीच आवडते. त्यांचा लीपलॉकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

व्हायरल झालेले हा व्हिडीओ एका बर्थ डे पार्टीतला आहे. ज्यामध्ये मौनी रॉय देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकत आहात की तेजस्वी प्रकाश व्हिडीओ पोस्ट करण्यास नकार देत आहे. मात्र करणला तो व्हिडीओ पोस्ट करण्यात काहीच गैर वाटत नाही असं देखील दिसत आहे. उलट तो, 'प्लीज व्हिडीओ पोस्ट करा' असं म्हणताना दिसत आहे.

Tejasswi and Karan’s lip lock video leaked
Rajiv Gandhi हत्याकांडातील दोषी सोबत थिरकला बाहुबलीचा कटप्पा, चर्चेला उधाण

सोशल मीडियावर तेजस्वी-करणचा लीपलॉकचा व्हिडीओ पाहून चाहते त्यांच्या भन्नाट केमिस्ट्रीचे सुपर फॅन झाले आहेत. हा व्हिडीओ ज्या पार्टीतला आहे ती बर्थ डे पार्टी निर्माता वॅनेसा वालियाची आहे. या व्हिडीओला रेकॉर्ड देखील वॅनेसानेच केले आहे. या पार्टीत तेजस्वी-करण व्यतिरिक्त छोट्या पडद्यावरचे अनेक स्टार कलाकार हजर राहिले होते.

Tejasswi and Karan’s lip lock video leaked
Arpita च्या घरात सापडले सेक्स टॉईज,अभिनेत्री श्रीलेखाचा याविषयी मोठा खुलासा

यांच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तेजस्वी प्रकाश लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. एकता कपूरच्या रागिनी एमएमएससाठी देखील तेजस्विला ऑफर मिळाली होती. तर दुसरीकडे एका मुलाखतीत दोघांना त्यांच्या लग्नाविषयी विचारले असता,''आता आमचं नातं फुलतंय आणि आम्ही तेअधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत'', असं उत्तर देत लग्नाच्या विषयावर बोलणं टाळलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com