नागराजच्या तीन शॉर्टफिल्म्स एकाच वेळी ओटीटीवर; जाणून घ्या सविस्तर... 

संतोष भिंगार्डे
मंगळवार, 14 जुलै 2020

जेव्हा नागराज फॅण्ड्री या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होता तेव्हा पावसामुळे चित्रीकरण थांबवावे लागले.  त्यावेळी नागराजला आपल्या बालपणाची आठवण झाली आणि ही कथा सुचली. 

मुंबई  ः मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. 'फॅण्ड्री', 'सैराट', 'नाळ' असे चित्रपट बनवून त्याने आपला वेगळा ठसा उमटविला. आता हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक झी ५ वर एकाच वेळी तीन शॉर्टफिल्म घेऊन येत आहे. एका अर्थी नागराज ओटीटीवर आपली हॅट््ट्रिक करीत आहे. 

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची पुन्हा बदली, नव्या आयुक्तांनी स्विकारला पदभार

'पावसाचा निबंध', 'बिबट्या-द लेपर्ड' व 'पायवट' असे त्या तिन्ही शॉर्टफिल्मची नावे आहेत. पावसाचा निबंध ही शॉर्टफिल्म नागराजने दिग्दर्शित केली आहे. जेव्हा नागराज फॅण्ड्री या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होता तेव्हा पावसामुळे चित्रीकरण थांबवावे लागले.  त्यावेळी नागराजला आपल्या बालपणाची आठवण झाली आणि ही कथा सुचली. 

चिंताजनक! राज्यातील युवाशक्तीच कोरोनाच्या सावटात; तब्बल 'इतक्या' हजारांहून अधिक तरुणाईला बाधा...

'बिबट्या- द लेपर्ड'चे दिग्दर्शन गार्गी कुलकर्णीने केले आहे. नागराज याचा प्रस्तुतकर्ता आहे. ही एका गावात बिबट्या आल्यानंतर गावकऱ्यांची अवस्था काय होते. त्याला पकडण्यासाठी काय काय केले जाते ही कथा यामध्ये आहे. तर तिसरी शॉर्टफिल्म 'पायवट' ही मिथुनचंद्र चौधरीने दिग्दर्शित केली आहे. नागराज प्रस्तुतकर्ता आहे. एका मजूराच्या मुलीची कहाणी यामध्ये आहे. या तिन्ही शॉर्टफिल्मचा 15 जुलै रोजी प्रीमियर आहे. 
---

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagraj manjules three short films premiers on zee 5 app on 15 july