
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) हिला पाहताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल असं तिचं सौंदर्य. अगदी लहान वयात तिनं आपलं सुंदर दिसणं,उत्तम अभिनय आणि त्याही उपर तिच्या चेहऱ्यावरच्या मोहित करणाऱ्या एक्सप्रेशन्सनी अनेकांना नकळत तिचं फॅन बनण्यास मजबूर केलं आहे. 'पुष्पा' या सिनेमामुळे तर तिच्या फॅन फॉलॉइंग मध्ये अधिक वाढ झाली आहे. या सिनेमात तिनं श्रीवल्ली ची भूमिका साकारली आहे. तिच्या 'सामी सामी' गाण्यानं तर सोशल मीडियावर व्हिडीओ रील्सचा नुसता पूर आणलेला पहायला मिळाला आहे. दक्षिणेत अनेक हीट्स दिल्यानंतर आता रश्मिका बॉलीवूडमध्ये एन्ट्री करीत आहे. त्यामुळे सध्या तिला अनेकदा मुंबईच्या हॉटेल्समध्ये लंच-डिनरला जाताना किंवा मुंबई विमानतळावर अनेकदा स्पॉट केले जाते.
एरव्ही मीडिया फोटोग्राफर्सनं फोटो काढण्यासाठी थांबायला सांगताच हसून उभी राहणारी रश्मिका मात्र काही लहान मुलींनी मदतीसाठी पैसे मागताच दुर्लक्ष करीत गाडीमध्ये जाऊन बसली. यामुळे रश्मिका गरीब मुलींना मदत न केल्यामुळे ट्रोल झाली आहे. रश्मिकाचा हा व्हिडीओ फिल्मी ग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. रश्मिका एका रेस्टॉरंटमधून बाहेर येते. त्यावेळी तिच्यासमोर अनेक लहान मुली येतात. त्यावेळी त्या रश्मिकाकडे पैसे मागतात. रश्मिका प्रेमाने पाहते त्यांच्याकडे, पण पैसे मात्र देत नाही. रश्मिकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
एक नेटकरी म्हणालाय,''काही पैसे दिले असते तर काय झालं असतं''. तर दुसरा नेटकरी म्हणाला,''मुलांना पैसे नाही तर काहीतरी खायला दिलं असतं तर काय झालं असतं''. तिसरा नेटकरी म्हणाला,''पैशांनी श्रीमंत आणि मनाने गरीब आहेत हे सेलिब्रिटी''. आणखी एकाने तर थेट दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबत तिची तूलना केली आहे. तो म्हणाला आहे,''हिच्या जागी सुशांत असता तर त्याने नक्कीच पैसे दिले असते''. सुशांतचा एक व्हिडीओ मागे व्हायरल झाला होता. ज्यात तो हॉटेलबाहेर आल्यावर काही गरिब मुलांना पैसे देत आहे हे दिसले होते. एका बाईने फुगे घेऊन पैसे द्या असं म्हटल्यावर त्यानं फुगे न घेता त्या फुगे विकणाऱ्या स्त्रीला पैसे देऊन मदतही केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.