esakal | Navarasa Teaser: मानवी जीवनाचा वेध घेणारा 'नवरस'
sakal

बोलून बातमी शोधा

Navarasa web serise

Navarasa Teaser: मानवी जीवनाचा वेध घेणारा 'नवरस'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ज्या मालिकेची जाणकार प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते ती नवरस (Navarasa) नावाची मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर ती प्रदर्शित होणार आहे. भारतीय पौराणिक कथेवर आधारित ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल अशी आशा मालिकेच्या निर्मात्यांना आहे. नवरसांवर आधारित या मालिकेचे दिग्दर्शन के वी आनंद यांच्याशिवाय आणखी काही दिग्दर्शकांनी केलं आहे. (navarasa teaser netflix anthology will be released on 6 august)

नवरसाविषयी बोलताना निर्माते मणिरत्नम (Maniratnam and jayendra panchkesan) आणि जयेंद्र पंचपकेसन म्हणतात, आम्ही या मालिकेच्या निमित्तानं एक मोठा प्रवास केला आहे. त्याच्या अनेक आठवणी आहेत. मोठ्या कष्टानं ही मालिका तयार केली आहे. आता ती कशी आहे हे ठरवण्याची वेळ आली आहे. प्रेक्षक योग्य तो न्याय करतील अशी आशा आहे. कोरोनामुळे आम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. त्याचा परिणामही या मालिकेच्या निर्मितीवर झाला. चित्रिकरणात अनेक अडचणी आल्या. मात्र यासर्वांवर मात करत आम्ही आपल्या समोर आलो आहोत.

नवरसा या मालिकेचा जन्म तमिळ फिल्म उद्योगाची मदत करण्यासाठी झाला आहे. त्यामागे ही मुख्य कल्पना आहे. याची कारण कोरोना महामारीत आपल्याला सापडतील. मोठ्या बिकट परिस्थितीचा सामना करुन आम्ही या मालिकेचे नऊ भाग पूर्ण केले आहेत. ही एक पौराणिक कथा आहे. त्या पौराणिक कथेत जे नवरस आहेत त्याचा आजच्या काळाशी असणारा संबंध या मालिकेच्या निमित्तानं मांडण्यात आला आहे.

हेही वाचा: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे आयुष्यच बदलून गेलं - कार्तिकी गायकवाड

हेही वाचा: मुंबई दंगलीच्या वेळी दिलीप कुमार-शरद पवार भेटीचा फोटो, शबाना आझमींनी केला शेअर

ही एका पौराणिक कथेवर आधारित मालिका आहे. ज्याचे एकुण 9 भाग आहेत. त्याचे निर्माते मणिरत्नम आणि जयदेंद्र पंचपकेसन हे आहेत. 9 भागांमध्ये एधीरी (करुणा), हास्य, प्रोजेक्ट अग्नि (आश्चर्य), पायसम (घृणा), शांती (शांती), रौद्रम (क्रोध), इनमाई (डर), थनिंगा पिन (साहस), गिटार कांबी मेले निंद्रु (प्यार) या भागांचा समावेश आहे. ही मालिका 190 देशांमध्ये 6 ऑगस्ट 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

loading image