Aaliya Siddiqui : 'मुलांना काय खाऊ घालू? पैसे नाहीत', नवाझुद्दीनच्या बायकोची व्यथा!

सेक्रेड गेम्सचा गणेश गायतोंडे फेम नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या हटक्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो.
Aaliya Siddiqui
Aaliya Siddiqui esakal

Nawazuddin Siddiqui bollywood Actor Aaliya : सेक्रेड गेम्सचा गणेश गायतोंडे फेम नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या हटक्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्याच्या बायकोनं सासू आणि पती नवाझुद्दीनच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

आता नवाझुद्दीनच्या पत्नीचा आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तिनं आपल्याला सध्या कोणत्या परिस्थितीतून जावं लागत आहे याविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. एकीकडे पतीच्या विरोधात कोर्टात लढाई तर दुसरीकडे मुलांचे जे हाल होत आहेत त्याविषयी आलियानं आपली खंत व्हिडिओतून बोलून दाखवली आहे. आलियाकडे मुलांना खाऊ घालायलाही पैसे नाहीत असे तिचे म्हणणे आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मला मुलांना सांभाळणं, त्यांना खाऊ घालणं हे कठीण होत आहे. कारण माझ्याकडे पैसेच नाहीत. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद समोर आले आहेत. प्रॉपर्टीवरुन सुरु झालेल्या या वादामध्ये नवाझुद्दीनच्या आईवर देखील आलियानं गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे नवाझुद्दीनच्या आईनं आलिया ही त्याची पत्नी नाहीच असे म्हटले आहे.

Aaliya Siddiqui
Arjun-Malaika Engagement: मलायका-अर्जुनचं ठरलं! पॅरिसमध्ये होणार साखरपुडा?

काही दिवसांपूर्वी नवाझुद्दीनच्या घरामध्ये काम करणाऱ्या एका महिलेनं त्याच्यावर पगार न दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नवाझुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. आलियानं माझ्यासोबत सासरच्या लोकांनी गैरव्यवहार केला आहे. त्यांनी आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com