दिपिका, सारा आणि श्रध्दाच्या  बँक खात्याची होणार चौकशी : आणखी सात मोठ्या अभिनेत्यांची चौकशीला बोलावणार

 NCB will investigate deepika, sara and sharadha bank account
NCB will investigate deepika, sara and sharadha bank account

मुंबई -  एनसीबीकडुन आता बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींच्या बँक खात्याची चौकशी होणार आहे. याबरोबरच बॉलीवूडमधल्या आणखी मोठ्या सात अभिनेत्यांना देखील येत्या पुढील काही दिवसांत बोलावणार असल्याचे कळते आहे. सुशांतचे आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. ड्रग्ज प्रकरणानंतर अभिनेत्रींच्या बँक खात्याच्या चौकशीतुन काय हाती लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

ज्या अभिनेत्रींची नावे ड्रग्ज प्रकरणात आली आहेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश एनसीबी प्रमुखांनी दिले आहेत. आता लवकरच ड्रग प्रकरणाशी संबंधित अभिनेत्यांची नावे समोर येणार आहेत. याशिवाय आता आपण सीबीआईच्या तपासाच्या अहवालाची वाट पाहत आहोत.असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. यापुर्वी २०१९ मध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये करण जोहरने ड्रग्ज घेतल्याचा आरोप करणवर करण्यात आला आहे. यासंबधीची अधिक माहिती इंटरनेटवरुन प्रसारित झाल्याने खळबळ उडाली होती. या पार्टीमध्ये दिपिका पादुकोण, रणबीर कपुर, वरुण धवन, शाहिद कपुर, अर्जुन कपुर यांच्यासह बाँलीवुड मधील अनेक कलाकार उपस्थित होते. सुशांतच्या आत्महत्येचा तपास करताना बाँलीवुड मधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे.  त्यानुसार अनेकांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. करण जोहरला समन्स बजावण्यात आल्यानंतर त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याबाबत खुलासा केला आहे.

यावेळी करणने त्याच्या प्राँडक्शन हाऊसमध्ये काम करणा-या क्षितिज प्रसादबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ड्रग्ज घेतल्या प्रकरणात क्षितिजचे नाव आले आहे. आता त्याला एनसीबीने अटक केली आहे. तसेच त्याची चौकशी सुरु आहे.आतापर्यत १४ जणांना एनसीबीकडुन समन्स पाठविण्यात आले आहे. यात दिपिका पदुकोण, सारा अली खान, रेहा चक्रवर्ती, सँम्युएल मिरांडा, जया साहा, दिया मिर्झा, करिश्मा प्रकाश, रकुल प्रित सिंग, श्रध्दा कपुर, शोविक चँटर्जी, श्रृती मोदी, दीपेश सावंत, सिमोन खंबाटा आणि ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.

यापुढील काळात आणखी ५० कलाकारांची नावे एनसीबीकडे तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. एनसीबीला सुशांतच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही ड्रग चँट मिळाले. तिथुन या घटनेला वेगळा रंग येण्यास सुरुवात झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com