Neena Gupta Viral Video: 60 वर्षांच्या नीनाजींच्या लूकपुढे दीपिकाही फिकी! नीनाजींना पाहिल्यावर काय म्हणाल?

Neena Gupta Viral Video
Neena Gupta Viral VideoEsakal

Neena Gupta Viral Video: बॉलीवूडची सुपरहॉट अभिनेत्री नीना गुप्ता हे नाव मनोरंजन विश्वातलं कायम चर्चेतलं आणि तितकचं लोकप्रिय नाव आहे. नीना या नेहमी चर्चेत असतात. मग ते वैयक्तिक कारणामुळे असो किंवा त्याच्या व्यावसायिक कारणाने.

नीना यांच्या वक्तव्याची ही बरीच चर्चा होत असते. काही दिवसांपुर्वी नीना यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्या परदेशी फिरायला गेल्या होत्या. पती विवेक मेहरासोबत फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद घेत होते.

Neena Gupta Viral Video
Tory Lanez: सुप्रसिद्ध गायकाला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, ३ वर्षांपुर्वींच्या गोळीबाराचं प्रकरण

नीना गुप्ता त्यांच्या ग्लॅमरस अवतारामुळे लाईमलाईटमध्ये राहतात. यावेळीही तसचं काहीतरी झालं. सध्या सोशल मिडियावर त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी शॉर्ट्स आणि हाय बूट घालून लूक पुर्ण केला आहे. त्याच्या या लूकची सोशल मीडियावर खुपच चर्चा आहे.

Neena Gupta Viral Video
Yaariyan 2 First Look: सिक्वेलचा धडाका सुरुच! गदर अन् OMG2 नंतर आता 'यारियां 2'

पापाराझींनी त्यांचा हा व्हिडिओ शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये नीना काळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये आणि उंच बूट आणि मॅचिंग पर्सही घेतली होती. साधा ब्राऊन शेड्सने त्यांनी त्यांचा स्टायलिश लुक कॅरी केला.

नीना नुकत्याच 'लस्ट स्टोरीज' आणि ‘ट्रायल पिरीएड’ मुळे चर्चेत होत्या. नुकतीच मुंबईत ‘ट्रायल पिरीएड’ या वेब सिरिजची सक्सेस पार्टी झाली त्यासाठी नीना आल्या होत्या.

नीना वयाच्या ६४ व्या वर्षीही इतक्या फिट आहेत. वयाच्या 64 व्या वर्षीही नीना यांनी केवळ त्यांच्या वयातील लोकांनाच नाही त्या तरुण चाहत्यांनाही आयुष्य आनंदाने आणि धैर्याने जगण्यासाठी प्रेरणा देतात लोक नीनांच्या लूकचे कौतुक करत आहेत.

Neena Gupta Viral Video
Seema Sachin Love Story: 'कराची टू नोएडा' सचिन सीमाची लव्हस्टोरी तर 'मेरा अब्दुल ऐसा नहीं है' मध्ये झळकणार अंजूची प्रेमकहानी..

एकाने लिहिले की, "कशाचीही पर्वा न करता त्या आयुष्य जगतात." तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'त्यांचा आत्मविश्वास खूप कौतुकास्पद आहे.'तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यांनी वयाचं भान ठेवलं पाहिजे अशाही काही कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नीना गुप्ता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'लस्ट स्टोरीज 2' आणि ट्रायल पिरीएड मध्ये दिसल्या आहेत. याशिवाय त्या 'इश्क नादान' मध्ये आणि 'पंचायत' या हिट वेब सीरिजच्या नव्या सीझनमध्येही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com