'प्रियकराने केली होती मारहाण' नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

नीना ज्याप्रकारच्या भूमिका साकारतात तसचं खऱ्या आयुष्यातही त्या बोल्ड आणि बिनधास्त आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बॉलिवूडच्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. वेगळ्या धाटणीचे, चौकटीबाहेरच्या भूमिका त्या नेहमीच साकारत असतात. सहज, सोप्या आणि तरीही प्रभावशाली अशी त्यांच्या अभिनयाची शैली आहे. अभिनयापलिकडे त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींची चर्चा पाहायला मिळते. नीना ज्याप्रकारच्या भूमिका साकारतात तसचं खऱ्या आयुष्यातही त्या बोल्ड आणि बिनधास्त आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 

Valentine Special : विराट-अनुष्का लहानपणीच पडले होते प्रेमात, खास व्यक्तीने सांगितलं सिक्रेट !

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Trying a contrast

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

सध्या नीना यांच्या करिअरची सेकंड इनिंग सुरु आहे. तरीही अनेक चॅलेंजिग रोलमधून त्या समोर येतात. याचदरम्यान त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी मोकळेपणाने चर्चा केली. एक खंबीर आणि कणखर महिला म्हणून ओळख असलेल्या नीना यांना त्यांच्या प्रियकराने शिवीगाळ करत मारहाण केल्याचं सांगितलं. 'रिपब्लिक वर्ल्ड' नुसार, वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं अफेअर होतं. याविषयी बोलताना नीना म्हणाल्या, ''आयुष्यामध्ये मी कायम खंबीर आणि कणखर भूमिका घेत आले आहे. आज माझी खंबीर स्त्री म्हणून ओळख असली तरीदेखील मी सुद्धा कधीकाळी अन्याय सहन केला आहे. माझ्यावरही अत्याचार झाले आहेत. माझ्या प्रियकराने माझी फसवणूक केली होती. त्याने माझा खूप छळ केला. शिवीगाळ करत मारहाणही केली".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My favourite colour  @shriparamanijewels #shubhmangalzyadasaavdhan

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

अशाप्रकारे त्यांनी प्रियकराविषयीचा धक्कादायक खुलासा केला. विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांनी लग्न केलं नाही. पण, मसाबा नावाची त्यांना एक मुलगी आहे. पण, नीना यांनी त्यांच्या मुलीचा एकटीने सांभाळ केला. याविषयी बोलत असताना पुढे त्या म्हणाल्या, '' तरुण वयात मी एकाच्या प्रेमात पडले. तो व्यक्तीही माझ्यावर प्रेम करत होता. पण, त्याचं दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न ठरलं. जर त्या मुलीने लग्नाला नकार दिला तर मी तुझ्या लग्न करेन असं माझ्या प्रियकराने मला सांगितलं. मात्र तसं झालं नाही. इतर महिलांप्रमाणेच माझ्या आयुष्यातदेखील काही प्रॉब्लेम आले. मात्र त्यांच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. तो म्हणजे मी या साऱ्यातून बाहेर पडले''.

साराला 'भाभी' म्हणून चिडवू लागले,अशी झाली तिची अवस्था ; पाहा व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

वयाच्या 60 व्या वर्षीही नीना गुप्ता फिट आणि सुंदर दिसतात. त्या तितक्याच बोल्ड आहेत. नीना गुप्ता यांनी 'मुल्क', 'बधाई हो', 'पंगा' या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारली. लवकरच 'शुभमंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात झळकणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Maa beti

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neena Gupta Makes A Shocking Revelation Says She Was Abused In A Relationship