माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री, 'हा' अभिनेता..

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नवा थरार आला आहे.
neha's first husband coming in majhi tujhi reshimgath
neha's first husband coming in majhi tujhi reshimgath sakal

Majhi tujhi reshimgath : झी मराठी (zee marathi) वरील माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय याने प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेच्या सुरुवातरीपासून प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण नुकताच पार पडला. मालिकेत आता यश आणि नेहाचे लग्न झाले असले तरी एक नवे वादळ तिच्या आयुष्यात येणार आहे. ते म्हणजे मालिकेत आता नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री होणार आहे. (neha's first husband coming in majhi tujhi reshimgath)

neha's first husband coming in majhi tujhi reshimgath
तरुणांचे हार्टबीट वाढवणारा 'टकाटक २' या दिवशी होणार प्रदर्शित..

मालिकेत आजवर नेहाच्या पहिल्या नवऱ्याविषयी फारसे बोलले गेले नाही. नेहाच्या पहिल्या नवऱ्याचे नाव अविनाश आहे. या अविनाशची सध्या मालिकेत एंट्री झाली आहे. आजवर नेहाचा नवरा गेला असे प्रेक्षकांना वाटत होते. पण आता एक वेगळाच ट्विस्ट मालिकेत आला आहे. नेहा आणि यशच्या लग्नानंतर नेहा आणि परी आता पॅलेस मध्ये राहायला गेले आहेत. आता याच पॅलेस मध्ये नेहाचा पहिला नवराही राहायला जाणार असल्याचे दाखवण्यात आले आहे.

neha's first husband coming in majhi tujhi reshimgath
..तर तुम्हाला चार लोकांसोबत.. 'या' अभिनेत्रीने सांगितला अत्यंत कटू अनुभव

मालिकेत अविनाशच्या एंट्रीचा मोठा ट्विस्ट पाहायला फार मज्जा येणार आहे कारण, अविनाश थेट यशच्या पॅलेसमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला लागणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, अविनाश पॅलेसमध्ये ड्रायव्हर म्हणून जातो. साहेबांच्या लहान मुलीसाठी ड्रायव्हर म्हणून मला बोलावलं आहे असं सांगतो. 'अखेर तुझ्या पॅलेसमध्ये मी आलोय नेहा, आता तु माझी बायको नसली तरी परी माझी मुलगी आहे', असं म्हणत अविनाश पॅलेसमध्ये एंट्री करतो. आता अविनाशच्या येण्याने नेहा आणि यश च्या नात्यात दरी निर्माण होणार का, यात नेहाची भूमिका काय असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.

अभिनेता डॉ. निखिल राजेशिर्के ( Actor Dr. Nikhil Rajeshirke) नेहाच्या पहिल्या नवऱ्याच्या म्हणजेच अविनाशच्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल हा झी मराठीवरील प्रेक्षकांसाठी ओळखीचा चेहरा आहे. निखिलनं आधी झी मराठीवर, 'आभाळमाया', 'अरुंधती' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे 'अजूनही बरसात आहे', 'एक मोहोर अबोल', 'दिल्या घरी तू सुखी रहा', 'लगोरी', 'प्रीती परी तुजवरी', 'लक्ष' सारख्या मालिकेतही काम केलं आहे. तसंच निखिलनं 'बायकर्स अड्डा', 'असेही एकदा व्हावे', '7 दोन 75', 'फक्त इच्छाशक्ती हवी' या सिनेमांमध्येही काम केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com