डॉ. लक्ष्मी सेहगल यांच्यावर 'बायोपिक', आझाद हिंद सेनेच्या होत्या प्रमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 डॉ. लक्ष्मी सेहगल यांच्यावर 'बायोपिक', आझाद हिंद सेनेच्या होत्या प्रमुख
डॉ. लक्ष्मी सेहगल यांच्यावर 'बायोपिक', आझाद हिंद सेनेच्या होत्या प्रमुख

डॉ. लक्ष्मी सेहगल यांच्यावर 'बायोपिक', आझाद हिंद सेनेच्या होत्या प्रमुख

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये आपलं मोठं योगदान देणाऱ्या डॉ.लक्ष्मी सेहगल यांच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही माहिती देण्यात आली आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी तयार केलेल्या आझाद हिंद सेनेतील महिलांच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये डॉ. लक्ष्मी यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे त्यांचं नाव जगभर झालं. ज्यावेळी स्रियांना घराबाहेर पडण्यास अनेक नियम आणि अटींना सामोरं जावं लागतं होतं त्याचवेळी डॉ लक्ष्मी यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतूक त्यांच्या कुटूंबियांनी केलं होतं. त्यांच्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या अनेक गोष्टींना यावेळी बायोपिकमधून सादर केले जाणार आहे.

डॉ.लक्ष्मी यांनी आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मी बाई रेजिमेंट तयार केली होती. त्यामध्ये त्यांनी महिलांना सहभागी करुन घेण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दक्षिण भारताचे नेतृत्व देण्यात आले होते. डॉ.लक्ष्मी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी पणाला लावलं. सगळ्या गोष्टीचा त्याग करुन केवळ देशसेवा, देशप्रेम आणि काही करुन भारताला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणे हे त्यांचे उद्धिष्ट होते. बायोपिकच्या माध्यमातून डॉ लक्ष्मी यांच्या आयुष्यावर मांडण्यात येणार आहे. अद्याप त्यांची भूमिका कोण करणार याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

डॉ.लक्ष्मी सहगल यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती चित्रपट निर्माते शाद अली तयार करणार आहे. डॉ.लक्ष्मी यांच्यातील चुणूक नेताजींनी ओळखली होती. त्यामुळे त्यांनी त्यांचा आझाद हिंदमध्ये समावेश केला होता. त्यांच्या रेजिमेंटनं आझाद हिंदच्या पुरुष फौजेसोबत लढाईतही सहभाग घेतला होता. डॉ.लक्ष्मी यांच्याविषयी सांगायचं झाल्यास त्या लहानपणापासूनच धीट स्वभावाच्या होत्या. त्यांचे वडील वकील होते. आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच सामाजिक सेवा, देशभक्ती यांचं वेड लागलं. आणि ते प्रत्यक्षात आचरणात आणून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...

loading image
go to top