
अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता ती मालिका प्रदर्शित झाली असून त्याला लाखोंचा प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई ; कोणी काही का म्हणेना गंदी बात या मालिकेनं आंबटशौकीन प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेच्या सहाव्या सीझनचा ट्रेलर नुकताच व्हायरल झाला होता. आता ती मालिका प्रदर्शित झाली आहे. त्याला आतापर्यंत लाखोंच्या संख्येनं हिटस मिळाले आहेत. वर्षभरापासून गंदी बात मालिकेनं नवनवीन एपिसोड प्रेक्षकांसाठी आणले आहेत. बोल्डनेस, हॉट, विषयाला वाहून घेतलेल्या या मालिकेचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. पण त्याची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यांच्या प्रतिसादाशिवाय मालिकेनं सहाव्या भागापर्यत मजल मारली आहे.
अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता ती मालिका प्रदर्शित झाली आहे. मालिकेच्या निर्मात्या एकता कपूर आहेत. ‘गंदी बात’ ही सीरिज बोल्ड सीन्ससाठी पाहिली जाणारी या सीरिजचा नवा ट्रेलर ज्यावेळी प्रदर्शित झाला तेव्हा कमी वेळेत लाखोंचे हिटस त्याला मिळायला सुरुवात झाली. या सीरिजचा 6वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गंदी बात 6’ मध्ये महिमा गुप्ता मुख्य भूमिका साकारणार आहे. महिमा सोबत अलिशा खान, केवल दिसाणी, निधी महवन, शिवम मेहता आणि मोहित शर्मा हे कलाकार देखील दिसणार आहेत. ‘गंदी बात 6’ अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉमवर 21 ला प्रदर्शित झाली होती.
गंदी बात ही मालिका तिच्या पहिल्या सीझनपासूनच ही सीरिज चर्चेत राहिली आहे. प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘गंदी बात 6’चा ट्रेलर पाहिल्यानंतर ही मालिका कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता लागली होती. ती आता संपली आहे. अल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘गंदी बात 6’ चा ट्रेलर शेअर केला होता. मालिकेत दाखविण्यात आलेला कंटेट हा कमालीचा बोल्ड असल्यानं मालिकेच्या सुरुवातीला वैधानिक चेतावणीही देण्यात आली आहे.
सोनालीनं कच-यात फेकलं जेवण; निक्की म्हणाली, बेशरम झाली...
या सीझनमध्ये तडका देण्यासाठी मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या सीरिजचा ट्रेलर लाखो लोकांनी पाहिला आहे. “पडद्याच्या मागेच सगळे रहस्य दडलेले आहेत. तर जागृत राहा कारण यंदाच्या सीझनमध्ये प्रेम, लोभ, धोका, खून आणि सस्पेंस भरपूर असणार आहे” या आशयाचं कॅप्शन शेअर केले आहे.