'या' हॉलीवूड अभिनेत्याला नेटकऱ्यांनी संतापत दिला नसबंदीचा सल्ला, कारण ऐकाल तर.. Hollywood Actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nick Cannon expecting baby no 9, Netizens funny comments

'या' हॉलीवूड अभिनेत्याला नेटकऱ्यांनी संतापत दिला नसबंदीचा सल्ला, कारण ऐकाल तर..

Hollywood: हॉलीवूड अभिनेता आणि कॉमेडियन निक कॅननच्या(Nick Cannon आयुष्यात आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः अभिनेत्यानं सोशल मीडियावर केला आहे. ४१ वर्षाच्या निकच्या घरी येणारं बाळ हे त्याचं नववं अपत्य असेल. मॉडेल ब्रिटनी बेलसोबत लग्न केल्यानंतर हे त्याचं तिसरं मुल आहे. अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर ब्रिटनीचं प्रेगनेन्सी दरम्यानचं फोटोशूट शेअर केलं आहे.(Nick Cannon expecting baby no 9, Netizens funny comments)

हेही वाचा: Taarak Mehta: जेठालालचीही एक्झिट? दिलीप जोशी चालले अमेरिकेला...

त्यानं शेअर केलेल्या मोंटाज व्हिडीओत निक कॅनन आणि मॉडेल ब्रिटनी बेल रोमॅंटिक पोझ देताना दिसत आहेत. ब्रिटनी आपलं बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर निक तिला मिठीत घेऊन रोमॅंटिक झालेला दिसतोय. याच व्हिडीओत ब्रिटनी बेल आणि निक कॅननला आपल्या इतर दोन मुलांसोबतही पोझ देताना पाहिलं जाऊ शकतं.

निक आणि ब्रिटनीसोबत दोन मुलं दिसत आहेत. एक ५ वर्षाचा मुलगा,ज्याचं नाव आहे गोल्डन सॅगन. तर एक १९ महिन्यांची मुलगी,जिचं नाव आहे पावरफुल क्वीन. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिले आहे,'Time Stopped and This Happened…'

ही बातमी जशी समोर आली तसं नेटकऱ्यांनी निकची मस्करी करायला सुरुवात केली . काहींचे म्हणणे आहे की अभिनेत्याला आता थांबायला हवं. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,' भावा थांब जरा...',तर दुसऱ्यानं लिहिलं आहे,'जर यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं झालं तर संपूर्ण एक शाळा भाड्याने घ्यावी लागेल चालवायला'. तर आणखी एकानं लिहिलं आहे,'भावानं शहराचीच जबाबदारी उचलल्यासारखा पराक्रम केलाय'. तर एकानं तर चक्क अभिनेत्याची नसबंदी करायचा सल्ला दिला. तर एकानं रागानं म्हटलं की,'हा हे सगळं मुद्दामहून करतो. ही गंभीर गोष्ट आहे'.

हेही वाचा: KBC: गुजरातच्या स्पर्धकाला रामायणच माहीत नाही,अगदी सोप्या प्रश्नाचं चुकवलं उत्तर

गोल्डन आणि पावरफुल या मुलांव्यतिरिक्त निक कॅननला त्याच्या आधीच्या पार्टनरकडूनही मुलं झालेली आहेत. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि गायिका मारिया कॅरेसोबत निकला ट्वीन्स झाले होते. एक मुलगा आणि एक मुलगी. ११ वर्षांच्या या मुलांची नावे मुनरो आणि मोरक्कन अशी आहेत. यावर्षी जुलैमध्ये निकने मॉडेल Bre Tiesi सोबत एका मुलाचं वेलकम केलं. या मुलाचं नाव कपलने लेजेंडरी लव कॅनन ठेवलं आहे.

प्रसिद्ध डीजे आणि प्रेझेंटर एबी दे ला रोजा पासून निक कॅननला ट्वीन्स झाले आहेत. १३ महिन्यांच्या या मुलांची नावे जिओन आणि जिलियन अशी आहेत. एबी आता आपल्या तिसऱ्या मुलाला देखील जन्म लवकरच देईल असं बोललं जात आहे. गायिका अलिसा स्कॉटकडूनही निकला एक मुलगा झाला होता. ज्याचं नाव जेन होतं. पण २०२१ मध्ये पाच महिन्याच्या जेनचा ब्रेन कॅन्सरनं मृत्यू झाला.

हेही वाचा: Liger: उद्धट विजय पुन्हा बोलला; थेट शाहरुखला दिलं चॅलेंज, म्हणाला,'तू काही...'

२०२१ च्या शेवटी निक कॅननने आपण काही काळासाठी ब्रह्मचार्य स्विकारत आहोत असं जाहीर केलं होतं. पण त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये त्यानं घोषणा केली की तो मॉडेल Bre Tiesi च्या मुलाचा बाप बनणार आहे. जून २०२२ मध्ये एका पॉडकास्टमध्ये त्यानं ही हिंट दिली होती की यावर्षात त्याची आणखी काही मुलं जन्माला येणार आहेत. तो म्हणाला होता की,''जेव्हा तुम्ही म्हणता की मुल होणार आहे,तेव्हा किती मुलं होणार याविषयी बोललं जातं का? तेव्हा माझी मुलं सगळी एकामागोमाग एक येण्याच्या मार्गावर आहेत,एवढंच सांगेन मी''.

हेही वाचा: बाबो! अक्षयला करोडोचा फायदा, कठपुतलीचे ओटीटी राईट्स ऐकाल तर उडतील होश...

नीक कॅननने पीपल मॅगझिन सोबत बाप बनण्याविषयी बातचीत केली होती. तो म्हणाला होता की,''तो बाप बनून भलताच खूश आहे. मी एक पिता म्हणून रोजच उत्साही अनुभव घेतो. मला माझी सगळीच मुलं खूप प्रिय आहेत. मी त्यांची प्रत्येक गोष्ट जवळून अनुभवण्यासाठी देखील खूप उत्साहित आहे''.

Web Title: Nick Cannon Expecting Baby No 9 Netizens Funny

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..