गेल्या १६ वर्षांपासून निक जोनासला आहे 'हा' आजार; पत्नी प्रियांका घेतेय काळजी | Nick Jonas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka chopra husband nick Jonas

गेल्या १६ वर्षांपासून निक जोनासला आहे 'हा' आजार; पत्नी प्रियांका घेतेय काळजी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा Priyanka Chopra पती आणि अमेरिकन गायक निक जोनास Nick Jonas याने बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्याच्या आजारपणाविषयी माहिती दिली. वयाच्या १३व्या वर्षी 'टाईप १'चा मधुमेह type 1 diabetes असल्याचं निदान झाल्याचं निकने या पोस्टद्वारे सांगितलं. मधुमेहाचं निदान झाल्यानंतर तो कशाप्रकारे खचला होता, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने कशाप्रकारे त्याची मदत केली आणि आता त्याची पत्नी प्रियांका कशाप्रकारे त्याला साथ देत आहे, याविषयी तो व्यक्त झाला. निकच्या या पोस्टवर प्रियांकानेही कमेंट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निक जोनासची पोस्ट-

'राष्ट्रीय मधुमेह महिन्यानिमित्त या आजाराशी लढणाऱ्या हिरोंशी मी दररोज माझ्या स्टोरीजच्या माध्यमातून भेटतोय. गेल्या १६ वर्षांपासून मलासुद्धा मधुमेह आहे. मी तेरा वर्षांचा होतो, माझ्या भावंडांसोबत शो करत होतो आणि तेव्हा मला कुठेतरी वाटत होतं की काहीतरी ठीक नाही. मी माझ्या पालकांना याविषयी सांगितलं आणि त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन तपास केला. तेव्हा मला टाईप १ मधुमेह असल्याचं निदान झालं. हे ऐकून मी अक्षरश: उद्ध्वस्त झालो होतो, खूप घाबरलो होतो. जगभरात फिरून शोज करण्याचं माझं स्वप्न अधुरंच राहील याची भीती मला वाटत होती. तो फार कठीण काळ होता, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी माझी अनेकांनी मदत केली', असं लिहित त्यांनी त्याची मदत करणाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा: 'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा

निकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या धैर्याचं कौतुक केलं. प्रियांकानेही टाळ्या वाजवण्याचा इमोजी पोस्ट केला. निकच्या वडिलांनीही कमेंटमध्ये लिहिलं, 'तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. पण तू आम्हा सर्वांना नवी प्रेरणा दिलीस, खूप प्रेम.' २०१८ मध्ये निकने पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या आजाराविषयी खुलासा केला होता.

loading image
go to top