esakal | शाळेत असताना 'असे' कपडे ?, फोटो व्हायरल, निधी ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेत असताना 'असे' कपडे ?, फोटो व्हायरल, निधी ट्रोल

शाळेत असताना 'असे' कपडे ?, फोटो व्हायरल, निधी ट्रोल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री आणि मॉडेल निधी अगरवालच्या (nidhi agerwal) नावाचा उल्लेख करावा लागेल. ती आपल्या हॉटनेससाठी प्रख्यात आहे. यापूर्वी तिनं अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर (viral on social media) व्हायरल केले होते. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता. आता ती चर्चेत आली आहे ते तिच्या शाळेतील फोटो व्हायरल झाल्यामुळे. त्याचे झाले असे की, निधीचा शाळेत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. (nidhhi agerwal upset because her photo circulated online she reacted trolls yst88)

चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटीनं (celebrities) काही चूकीचं कृत्य केलं की राग येतो हे काही नवीन नाही. अशावेळी त्या सेलिब्रेटीविरोधात सोशल मीडियावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. असचं काहीसं निधीच्या बाबत झालं. शाळेत असताना कुठे ट्रीपला गेली असताना त्याठिकाणी बिकीनीतील काही फोटो तिनं काढले होते. आता ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे निधीनं राग व्यक्त केला आहे. याशिवाय तिला ट्रोलर्सनं ट्रोल देखील केलं आहे.

दाक्षिणात्य सिनेमातील मोठं नाव म्हणून निधीकडे पाहिले जाते. सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते. तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. तिनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिनं लिहिलं आहे की, सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. मात्र ते हेतुपूर्वक व्हायरल करणे हा वेगळा भाग आहे. एखादा सुजाण नागरिक अशा फोटोंना शेयर करणार नाही. तो तसे करताना विचार करेल. दरवेळी आपल्या भुतकाळातल्या आठवणींना वर्तमानाशी जोडून पुन्हा त्या जख्मांची आठवण का काढायची हा माझा प्रश्न आहे. असेही निधीनं म्हटलं आहे.

हेही वाचा: Video: मुंबईच्या भर पावसात मिका सिंगची गाडी पडली बंद, चाहते धावले मदतीला

हेही वाचा: 'येऊ कशी..'मधील मोहितची रिअल लाइफ पार्टनर, पहा खास फोटो

एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, निधीनं आपला राग हा तिचा शाळेतील फोटो व्हायरल झाल्यानंतर व्यक्त केला आहे. तिला जो प्रकार आपल्याबाबत घडला त्याविषयी नाराजी आहे. आणि तिनं ती बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे शाळेतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यात तिनं बिकिनी घातली होती.

loading image