esakal | Video: मुंबईच्या भर पावसात मिका सिंगची गाडी पडली बंद, चाहते धावले मदतीला
sakal

बोलून बातमी शोधा

mika singh

Video: मुंबईच्या भर पावसात मिका सिंगची गाडी पडली बंद, चाहते धावले मदतीला

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंगचा Mika Singh एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओमध्ये मिका आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी Akanksha Puri हे दोघे गाडीमध्ये बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या गाडी बाहेर अनेक लोक घोळका करून उभे आहेत. मिका आणि आकांक्षा हे राहुल वैद्य-दिशा परमारच्या लग्न सोहळ्यावरून घरी जात असताना त्यांची गाडी अचानक बंद पडली. तेव्हा तेथील एका माणसाने हा व्हिडीओ शूट केला. (mika singh car breaks down at 3 am in mumbai rains fans come for help)

व्हिडीओमध्ये एकजण म्हणतोय, 'जेव्हा मिका सिंगची गाडी बंद पडते, तेव्हा त्याचे चाहते मदत करायला येतात. ' व्हिडीओमध्ये मिकाने सांगितले, 'माझी गाडी बंद पडली आहे. कमीत कमी 200 लोक आले आहेत मदत करायला.' फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मिकाने हा व्हिडीओ शेअर करुन लिहिले, 'मुंबईकर बेस्ट आहेत.'

हेही वाचा: युट्यूब व्हिडिओत 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थ मृत घोषित; तक्रारीवर अजब उत्तर

हेही वाचा: नेहा धुपियाकडे पुन्हा 'गुड न्यूज'! दुसऱ्यांदा होणार आई

काही दिवसांपूर्वी मिका सोशल मीडियावर कमाल आर खानसोबतच्या वादामुळे चर्चेत होता. केआरकेनं मिका सिंगवर टीका करताना असं म्हटलं होतं, 'मी आता एका किडमि़ड्या गायकाचाही रिव्ह्यू करणार आहे.' तेव्हा पासून मिका आणि कमाल आर खान या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मिकाने नुकतीच राहुल आणि दिशाच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. राहुलच्या संगीत सोहळ्यात वेगवेगळी गाणी गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये विकी कौशलचा जबरदस्त रॅप; दीपिका, हृतिकही प्रभावित

loading image