esakal | 'लग्नाला सात महिने झाले, तिनं रंग दाखवायला सुरुवात केली'
sakal

बोलून बातमी शोधा

nikhil jain and nusrat jahan

'लग्नाला सात महिने झाले, तिनं रंग दाखवायला सुरुवात केली'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - तृणमुल कॉग्रेसच्या खासदार नुसरत जहॉ (nusrat jahan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिनं लोकसभेत घेतलेली शपथ ही खोटी (fake oath) असल्याचा आरोप अनेक पक्षातल्या राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन ते प्रकरण चर्चेत आले आहे. निखिल जैन (nikhil jain) आणि नुसरत जहॉ या दोघांमधील नात्याबाबत निखिलनं सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे नुसरतविषयी आणखी एक नवी माहिती समोर आलीयं. त्याच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रियेमुळे त्या दोघांच्या फॅन्सला धक्का बसला आहे. (nikhil jain hinted nusrat jahans affair with yash dasgupta in his statement )

काही दिवसांपासून निखिल जैन आणि नुसरत जहा यांच्या रिलेशनशिप (reletionship) बाबत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होतेय. त्यात नेमकं काय खरे आहे याविषयीची उत्सुकता दोघांच्याही चाहत्यांना होती. आता निखिलनं त्या रिलेशनशिपबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. वास्तविक त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कडवटपणा का आला असा प्रश्न यानिमित्तानं समोर आला आहे. गेल्या महिनाभरांपासून त्यावर चर्चा सुरु आहे. दुसरीकडे अशी चर्चा आहे की, नुसरतचे सहकलाकार दासगुप्ता याच्याशी अफेअर सुरु आहे. निखिलनं जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात त्यानं यशचे नाव घेतलेलं नाही.

nikhil and nusrat jahan

nikhil and nusrat jahan

निखिलनं लिहिलं आहे की, 2020 च्या ऑगस्टमध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये तिचा स्वभाव बदलायला लागला होता. त्याचे कारण तिलाच माहिती आहे. शेवटी माझ्या पत्नीच्या स्वभावात असा बदल का होतो आहे याचा विचार जेव्हा मी करायला लागलो तेव्हा त्याचा मला त्रास झाला. यश दासगुप्ता आणि नुसरत हे दोघेही एका चित्रपटात दिसणार आहे. त्यात मिमि चक्रवर्ती दिसणार आहेत. त्या चित्रपटाचे नाव एसओएस कोलकाता असे आहे.

हेही वाचा: 'बहुत बुरा लगता है'; मनोज वाजपेयीने सांगितला पत्रकारांसोबतचा अनुभव

हेही वाचा: Video : माधुरीच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स

निखिलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलयं, माझं तिच्यावर प्रेम नव्हत तरीही तिनं मला प्रपोज केलं होतं. तिनं मला स्वीकारल होतं. आम्ही आमच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुर्कस्थानात गेलो होतो. 2019 मध्ये आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही जवळच्या सर्वांना कोलकातामध्ये रिसेप्शनही दिले होते. समाजामध्ये आम्ही नवरा बायको आहोत हे आता सर्वांना माहिती झाले होते. मी तिच्यासाठी सर्व काही केले, मी नेहमी तिला पाठींबा दिला. मात्र ती अशी का वागली हे मला माहिती नाही.