Corona Effect : ब्लॅक नाही, तर ब्लँक फ्रायडे!

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 20 March 2020

यापूर्वी अशी घटना 1986 मध्ये घडली होती. मनोरंजन कर कमी करावा, तसेच 'व्हिडीओ'द्वारे होणारी पायरसी थांबवावी याकरिता चित्रपटसृष्टीने मोठा बंद पुकारला होता.

मुंबई : सध्या कोरोना अधिक उग्र रुप घेण्याची दाट शक्यता असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणाना आवश्यक सूचना केल्या आहेत. आपापल्या परिसरातील शाळा-महाविद्यालये, मॉल्स आणि थिएटर्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांनीही घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे शहरांमधील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून आले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाबाबत खबरदारी म्हणून अनेक राज्यांतील चित्रपटगृहे (मल्टिप्लेक्स थिएटर्स) बंद असल्यामुळे शुक्रवारी (ता.20) एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या ऐतिहासिक शुक्रवारची विशेष नोंद होणार आहे.

- वाईन शॉप, देशी दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने चित्रपटगृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यातच चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांशी संबंधित असलेल्या संघटनांनी चित्रीकरण बंद करण्याचे गुरुवारपासून जाहीर केले. त्याप्रमाणे सगळीकडे चित्रीकरण बंद झाले आहे.

खरे तर प्रत्येक शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतो. एखाद्या 'बिग बजेट' आणि 'बिग स्टार्स' असलेल्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात; परंतु हिंदीसह अन्य कोणत्याही भाषेतील चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही.

- जागतिक चिमणी दिन : चिमण्यांची घटती संख्या मानवासाठी अधिक धोकादायक!

यापूर्वी अशी घटना 1986 मध्ये घडली होती. मनोरंजन कर कमी करावा, तसेच 'व्हिडीओ'द्वारे होणारी पायरसी थांबवावी याकरिता चित्रपटसृष्टीने मोठा बंद पुकारला होता. त्यावेळी साधारण एक महिना कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता, पण हा बंद केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. तेव्हा गुजराती, बंगाली आणि दक्षिणेत चित्रपट प्रदर्शित झाले होते; परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे.

- राखी सावंतची कोरोनावर मुक्ताफळं, म्हणाली 'तुमच्या कर्मांची फळं..'

आज संपूर्ण देशभरात कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तसेच 27 मार्चला कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. ही बाब इतिहासात नोंद होणारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No movies are released on friday became a history in Indian Film Industry