
नोरा फतेही नेटिजन्सच्या निशाण्यावर...या वागणुकीने झाली ट्रोल..
नोरा फतेहीच्या डान्स मूव्जचे सगळेच दिवाणे आहेत.पण मात्र शोच्या सेटवर जातानाच्या एका व्हिडिओवरून नोराला ट्रोल व्हावं लागलं.नोराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.या व्हिडिओमध्ये नोराच्या साडीचा पदर सांभाळत सेक्युरीटी गार्ड दिसतोय.या व्हिडिओला बघून नेटकऱ्यांनी नोराला निशाण्यावर धरलंय.
या व्हिडिओमध्ये गार्ड स्वत: पावसात भिजत होता.आणि नोराच्या साडीचा पदर सांभाळत तिला मदत करत होता.त्या गार्डला व्हिडिओमध्ये बघून नेटकऱ्यांनी त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.नोरा फतेही सेटवर जात असतानाचा हा व्हिडिओ आहे.या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी घातली आहे.या साडीचा पदर फार लांब होता.तिचा हा पदर खाली पर्यंत जमिनीला लागत होता.नोरा जेव्हा गाडीने निघाली होती तेव्हा एक व्यक्ती नोरासाठी छत्री घेऊन उभा होता.नोरा गाडीतून खाली उतरताच सेक्यूरिटी गार्डला तिचा पदर पकडताना पाहिलं गेलं.
त्यानंतर नोरा वॅनिटी कारकडे जाताना दिसतेय.आणि गार्ड तिच्या मागे तिचा पदर पकडून वाकून चालताना दिसतोय.नोराचा पदर सांभाळत तिला वॅनिटी कारपर्यंत सोडताना हा गार्ड पावसाने भिजलेला असतो.हा व्हिडिओ बघताच नेटकऱ्यांच्या कमेंटचा वर्षाव झालाय.अनेकांनी हा व्हिडिओ बघून तिला ट्रोल केलंय.
हेही वाचा: Nora Fatehi: काय कळेना! नोरा फतेहीचं 'Insta' अकाउंट डिलिट
एका नेटकऱ्याने तर,'कपडे स्वत: घालायचे आणि दुसऱ्यांना सांभाळायला लावायचे', अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.तर दुसऱ्याने, 'गार्डला गुलामासारखं वागवते असं म्हटलंय.तर काहींनी गार्डविषयी साहानुभूती व्यक्त केली आहे.
Web Title: Nora Fatehi Trolled By Netizens Guard Carry Her Saree In Rain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..