Rumored Couples Of South: रश्मिका-विजयच नव्हे तर साऊथच्या या कलाकारांच्या अफेअरची चर्चा

आज आम्ही तुमच्यासाठी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही खास रुमर्ड कपल्सची माहिती घेऊन आलो आहोत. पण अद्याप एकाही कलाकारानं नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda
Rashmika Mandanna and Vijay DeverakondaSakal

तमन्ना भाटिया असो की रश्मिका मंदान्ना, आजकाल साऊथ स्टार्स त्यांच्या अफेअर्समुळे खूप चर्चेत आहेत. विशेषत: नवीन वर्षाच्या दिवशी हे रुमर्ड कपल्स एकत्र वेळ घालवताना दिसले. मात्र, असे असूनही त्यांच्या नात्याबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही. आज आम्ही तुमच्यासाठी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही खास रुमर्ड कपल्सची माहिती घेऊन आलो आहोत. पण अद्याप एकाही कलाकारानं नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda
Aryan khan: नोरा नाही तर 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय शाहरुखचा शहजादा..

तमन्ना भाटिया और विजय

तमन्ना भाटिया आणि विजय यांच्या अफेअरची बातमी जोरात सुरू आहे. तमन्ना भाटिया आणि विजय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण, विजय आणि तमन्ना यांना गोव्यातील एका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आले होते. यावर विजय आणि तमन्ना या दोन्ही कलाकराकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच गोव्यात पार्टी करतानाही या दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले होते. तेव्हापासून दोघांची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला

नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाला डेट करत असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या आणि लंडनमध्ये दोघांना टाईम स्पेंड करताना स्पॉट करण्यात आले होते. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांपैकी कोणीही यावर भाष्य केले नाही. नागा चैतन्यने समंथासोबत लग्न केले होते आणि २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या रिलेशनशिपच्या बातम्याही खूप चर्चेत आहेत. नुकतेच नवीन वर्षात दोघे एकत्र असल्याची बातमी समोर आली होती. चाहत्यांना खात्री आहे की दोन्ही स्टार्सने शेअर केलेले सर्व फोटो एकाच ठिकाणाहून शेअर केले आहेत आणि ते दोघे मिळून मालदीवमध्ये नवीन वर्ष साजरे करत होते. मात्र, डेटिंगच्या प्रश्नावर रश्मिकाने अनेकदा याला मैत्रीचे नाव दिले आहे. आता, दोघांनी नवीन वर्ष एकत्र सेलिब्रेशन केल्याचे फोटो समोर आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com