आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट होणार प्रदर्शित..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

कोरोनामुळे सगळे जनजीवन ठप्प झाले आहे.  कोरोनाला अटकाव करण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे.

मुंबई:  कोरोनामुळे सगळे जनजीवन ठप्प झाले आहे.  कोरोनाला अटकाव करण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे.

लाॅकडाऊन वाढेल की नाही याबाबत सगळीकडे तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मनोरंजन सृष्टीचा विचार करता येथील सगळे चित्रीकरण बंद आहे त्याचबरोबर चित्रपटगृहेदेखील  बंद आहेत. ती कधी सुरू होतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे काही निर्मात्यांनी आपले पूर्ण झालेले चित्रपट आता ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा: महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...

गुलाबो सीताबो, शकुंतला देवी हे  चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्वर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर अन्य काही हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.  आता हिंदी चित्रपसृष्टीनंतर मराठी चित्रपटसृष्टीदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळली आहे. लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर परिणती हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

यापूर्वी माधुरी दीक्षितचा १५ आॅगस्ट आणि प्रियांका चोप्राचा फायर ब्रॅण्ड हे मराठी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाले आहेत. आता लाॅकडाऊनच्या काळात परिणती हा पहिला मराठी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता अक्षर कोठारी यांची मुख्य भूमिका या चित्रपटामध्येआहे.  याबाबत चित्रपट निर्माता-कास्टींग दिग्दर्शक पराग मेहता सांगतात,'बॉलिवूड चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आपले पाऊल टाकले आहे. 

हेही वाचा: राज्यपालांना पत्र पाठवून राज ठाकरेंनी केली 'ही' खास मागणी....

सध्याची परिस्थिती अशी आहे की चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावे लागत आहे. कारण चित्रपटसृष्टीत सध्या टिकून राहणं फार गरजेचे आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं देखील तितकेच महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्याकडे ओटीटी प्लॅटफॉर्म हा एकच पर्याय होता आणि आम्ही तो निवडला. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित करण्याची आम्ही अधिकृत घोषणा करू.' या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय बालसराफ यांचे आहे. त्यांनी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

now marathi movies will releases on OTT platform read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now marathi movies will releases on OTT platform read full story