esakal | आता अभिनेता राजीव खंडेलवाल लढणार नक्षलवाद्यांविरुद्ध! कसे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

आता अभिनेता राजीव खंडेलवाल लढणार नक्षलवाद्यांविरुद्ध! कसे ते वाचा

छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या राजीव खंडेलवालने वेबविश्वात पाऊल टाकले आणि येथेही आपला ठसा चांगला उमटविला. आता तो झी ५ वर येणाऱ्या नक्सल या वेबसीरीजमध्ये काम करीत आहे.

आता अभिनेता राजीव खंडेलवाल लढणार नक्षलवाद्यांविरुद्ध! कसे ते वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या राजीव खंडेलवालने वेबविश्वात पाऊल टाकले आणि येथेही आपला ठसा चांगला उमटविला. आता तो झी ५ वर येणाऱ्या नक्सल या वेबसीरीजमध्ये काम करीत आहे. ही अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेली मालिका असून राजीव खंडेलवाल यामध्ये राघव नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारीत आहे. नक्सल चळवळीविरुद्ध लढणाऱ्या एका योध्दाची कथा यामध्ये दाखविण्यात येणार आहे. हा राघव सर्व आव्हानांचा सामना कसा करतो, त्याला नक्षलवाद्याविरुद्ध लढताना कोणकोणत्या समस्यांचा सामोरे जावे लागते या बाबी दाखविण्यात आल्या आहेत.

सुशांतच्या निधनानंतर बिहारच्या 'या' लोकगायिकेने बॉलीवूड गायन केले बंद 

‘‘नक्सल’’ची निर्मिती ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी केली आहे. राजीव खंडेलवालसह मालिकेत टीना दत्ता, श्रीजीता डे, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या भूमिकाही आहेत. पार्थो मित्रा दिग्दर्शक आहेत. ही आठ भागांची मालिकाआहे आणि ती काल्पनिक कथेवर बेतलेली आहे. राजीव खंडेलवाल म्हणतो, की माझ्या चाहत्यांसाठी ही भूमिका म्हणजे एक सरप्राईज आहे. विनोदी अंगाने ही मालिका सुरू होईल आणि नंतर अॅक्शनच्या अंगाने जाणारी आहे.  

या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत. पण सरतेशेवटी यात निवडण्यात आलेले सर्वच कलाकार व तंत्रज्ञ हे खूपच ताकदीचे आहेत. आमीर, सत्यदीप, टीना आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. त्यांच्यापैकी एकाहीबरोबर मी अद्याप काम केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. या मालिकेसाठी आम्ही संहितावाचन केले आहे. या काळात मी माझ्या व्यक्तिरेखेवर काम केले आहे. मला असे वाटते की माझ्या चाहत्यांसाठी ही एक मेजवानी असेल, कारण त्यांनी आतापर्यंत मला यासारख्या व्यक्तिरेखेमध्ये कधीही पाहिलेले नाही.

वाचा - आज रपट जायें तो...

 आज देशाला जी गोष्ट पोखरत आहे, अशा कथेवर ही मालिका बेतलेली आहे. पण त्याचवेळी त्यातून पूर्ण मनोरंजन होईल, याची काळजी घेतली गेली आहे. राजीव खंडेलवाल यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे, पण त्याचबरोबर अत्यंत प्रतिभावान असे इतर कलाकार व तंत्रज्ञ या मालिकेत आहेत, असे उद््गार ‘‘नक्सल’’चे निर्माते अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी काढले.