esakal | RRR चं टेन्शन वाढलं, रिलीज डेट पुढे ढकलण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Movie Poster

RRR चं टेन्शन वाढलं, रिलीज डेट पुढे ढकलण्याची शक्यता

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टॉलीवूडमधील (Tollywood) प्रसिध्द चित्रपट आरआरआरचं ( Movie RRR) पोस्टर ज्यावेळी व्हायरल झाले होते तेव्हा चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर त्याच्या टीझरलाही (Teaser on social media) सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या चित्रपटाची कथा, त्यातील अभिनेते आणि त्याच्या तांत्रिक बाबी यामुळे प्रेक्षकांना आरआरआर केव्हा प्रदर्शित होणार याविषयी उत्सुकता होती. मात्र सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत ज्या बातम्या प्रसिध्द होत आहे त्यातून त्याची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ( ntr junior and directed by ss rajamouli film rrr release postponed)

प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता एसएस राजमौली (ss rajamouli film ) हे आरआरआरचं दिग्दर्शन करत आहे. यापूर्वी त्यांच्या बाहुबली चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तो बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्यानंतर त्यांच्या आरआरआर चित्रपटाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली होती. त्याच्या पोस्टर आणि टीझरलाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. विशेषत त्याच्या टीझरला मिळालेला प्रतिसाद चर्चेचा विषय झालो होता.

सध्या आरआरआरच्या रिलीज डेटविषयी चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचा फटका मोठमोठ्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना बसला आहे. आरआरआरमध्ये दिग्गज अभिनेता रामचरण तेजा (ram charan teja ) आणि एनटीआर ज्युनिअर (ntr junior ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूडचा अजय देवगण (Ajay devgn) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) हे कलाकारही आरआरआरमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा: Neena Gupta: 'डिलिव्हरीसाठी पैसेसुद्धा नव्हते, पण..'

हेही वाचा: 'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमी 'या' अभिनेत्याला करतेय डेट?

आरआरआरच्या प्रदर्शनाची तारीख सातत्यानं पुढे ढकलण्यात येत आहे. 13 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. कोरोनामुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार आरआरआरच्या एका अभिनेत्यानं ही माहिती दिली आहे. या चित्रपटातील काही अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्युनिअर एनटीआरला कोरोना झाला होता.