शेखर सुमनना असं काय जाणवलं की राजू श्रीवास्तवना दिलेला तब्येत सांभाळण्याचा सल्ला Raju Shrivastava | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Suman on Raju Shrivastava Health;said told to focus on his health

शेखर सुमनना असं काय जाणवलं की राजू श्रीवास्तवना दिलेला तब्येत सांभाळण्याचा सल्ला

Raju Shrivastava: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना गेल्या एक आठवड्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. राजू यांना लवकर बरं वाटावं यासाठी त्यांचे चाहते प्रार्थन करत आहेत. राजू यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा थोडी सुधारणा झाल्याचं बोललं जात आहे. आता ते औषधोपचारांना प्रतिसाद देत असले तरी अद्याप ते पूर्ण शुद्धीत नाहीत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी आता त्यांचे मित्र शेखर सुमन(Shekhar Suman) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Shekhar Suman on Raju Shrivastava Health;said told to focus on his health)

हेही वाचा: सचिनचं पहिलं लग्न झालंय म्हणून सुप्रियाने नकार दिला होता? जाणून घ्या लव्हस्टोरी

शेखर सुमन यांनी म्हटलं आहे की, राजू श्रीवास्तव यांना ते दोन आठवड्यांपूर्वीच इंडियाज लाफ्टर चॅंपियनच्या सेटवर भेटले होते. शेखर सुमन म्हणाले आहेत की, राजू यांची प्रकृती स्थिर आहे. तीन दिवस आधीच त्यांनी बोटांची हालचाल केली होती. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. मला आशा वाटत आहे की राजू लवकरच बरे होतील आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. १५ दिवस आधीच राजू मला इंडियाज लाफ्टर चॅलेंजच्या सेटवर भेटला होता. व्हॅनिटी वॅनमध्ये आम्ही खूप वेळ गप्पा देखील मारल्या.

हेही वाचा: 'कतरिनाशी झटपट लग्न व्हावं म्हणून मी...', विकी कौशलचा करण समोर मोठा खुलासा

''मी नोटिस केलं तेव्हा मला तो थोडा कमजोर वाटला. मी त्याला सल्ला दिला की, जास्त धावपळ करु नकोस,खूप व्याप वाढवू नकोस. तो तेव्हा ठीक होता. पण मी त्याला म्हणालो होतो की,आपल्या तब्येतीची काळजी घे. राजूने उत्तरादाखल म्हटलं की,मला काहीच आजार झालेला नाही. सगळं नीट सुरु आहे. मी देखील ठीक आहे. आणि त्यानंतर लगेचच राजूची ही धक्कादायक बातमी कानावर पडली. मी राजूला गेल्या २५ वर्षापासून ओळखतो आहे. आम्ही एकत्र मिळून काम केलं आहे. तो खूप मस्त माणूस आहे. मला माहिती आहे तो बरा व्हावा यासाठी पूर्ण देश देवाकडे प्रार्थना करत आहे''.

हेही वाचा: Jacqueline वादग्रस्त प्रकरणावर आर.माधवन म्हणाला,'यामुळे देशाची प्रतिमा...'

राजू श्रीवास्तव यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव दिल्लीला कामानिमित्तानं आले होते. हॉटेलच्या जीममध्ये वर्कआऊट करताना त्यांना ट्रेडमिलवरच हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. काही दिवस व्हेंटिलेटरवर आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत आता हळूहळू का होईना पण सुधारणा होताना दिसत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की राजू श्रीवास्तव यांना बरे होण्यास आणखीन एक आठवड्याचा कालावधी लागेल.सध्या त्यांना कोणतंही इन्फेक्शन होऊ नये यासाठी कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Shekhar Suman On Raju Shrivastava Healthsaid Told To Focus On His Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..