अमेरिकेत ओमीक्रॉन वाढतोय; ६४ वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा आता 'या' तारखेला

'नॅशनल अॅकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अॅन्ड सायन्स' या संस्थेनं जाहीर केली तारीख
Grammy Award
Grammy Award Google

कोरानाच्या (Corona)ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटनं केवळ भारतातच नाही तर जगभरात आपलं थैमान मांडलं आहे. पुन्हा अनेक देशांनी,देशातील राज्यांनी कोरोनाविषयीचे नियम कडक केले आहेत. याचाच परिणाम म्हणून मनोरंजन क्षेत्रानेही काही महत्त्वाचे निर्णय घेत शुटिंगच्या तारखा,सिनेमाचं प्रमोशन, प्रदर्शनाच्या तारखा तसंच अनेक सोहळेही पुढे ढकलले आहेत. बरं हे फक्त बॉलीवूडपुरतं नाही तर हॉलीवूडनेही जारी केलं आहे. याचाच परिणाम म्हणून वर्षातील संगीत क्षेत्रात मानाचा अन् महत्त्वाचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याची तारीख बदलल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं होतं,आता नवीन तारिख जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेतील नॅशनल अॅकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अॅन्ड सायन्सनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या सोहळ्याची तारीख ३१ जानेवारी ही बदलून ३ एप्रिल असेल असं जाहीर केलंय. तसंच हा सोहळा लास वेगास च्या एमजीएम ग्रॅंड गार्डन एरियामध्ये होणार असल्याचंही त्यात नमूद केलंय.

आधी ३१ जानेवारी रोजी हा सोहळा लास वेगासच्या डाऊनटाऊन शहरात होणार होता. पण आता सोहळ्याचं स्थळही बदलण्यात आल्याचं यावरून दिसत आहे. या सोहळ्यात अनेक मोठे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. तसंच प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेवर नूह या सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत. २०२१ मध्येही जानेवारी महिन्यात सोहळा कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. आणि नंतर मार्च महिन्यात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत सोहळा पार पडला होता. गेल्यावर्षी तर उपस्थितांना प्री-रेकॉर्ड केलेले कार्यक्रम पडद्यावर दाखवण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या ६४ व्या ग्रामी अॅवॉर्ड सोहळ्यातही हाच नियम पाळला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.

Grammy Award
'जैसा बाप,वैसी बेटी';कपिलच्या 'ड्रमर' मुलीवर चाहते फिदा

ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिकेतील नॅशनल अॅकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अॅन्ड सायन्स संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला होता. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केला जात आहे. २००४ पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जात होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com