
Onkar Bhojane: 'हौस आकाशी उंच उडायची', ओंकार भोजनेबद्दल सत्यजीत तांबेंची 'ती' पोस्ट व्हायरल
Onkar Bhojane viral video: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता ओंकार भोजने हा मराठी मनोरंजन विश्वात सध्या चर्चेत आहे. त्याला या शोमध्ये लोकप्रियता मिळालीच मात्र त्याने शो सोडल्यानंतरही त्याची चर्चा रंगली. शो सोडल्यानंतर ओंकारनं 'सरला एक कोटी' या मराठी सिनेमात प्रमुख भूमिका साकरली. ही त्याचा पहिलाच मुख्य भुमिकेतील चित्रपट होता.
सध्या सोशल मिडियावर पुन्हा ओंकारचीच चर्चा रंगली आहे. त्याच कारण आहे त्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ. या व्हिडिओत ओंकार कविता म्हणताना करतांना दिसत आहे. तो आपल्या दमदार आवाजात ओंकारनं “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची” ही कविता गातोय.
त्याच्या गाण्यावर प्रेक्षक टाळ्या आणि शिट्यांच्या आवाजात दाद देतांना दिसताय. आता त्याचा हा व्हिडिओ अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात ओंकारने ही कविता सादर केली होती.
हा व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच त्यांनी “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची…कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !” असं कॅप्शन दिलं. आता या व्हिडिओला सर्वच स्तरातील लोक प्रतिक्रिया देत आहेत.
एकानं कमेंट करत लिहिलय, 'जितका उत्कृष्ट अभिनेता तितकाच उत्तम गायक...तरुण पिढी साठी आदर्श' दुसऱ्यांन लिहिलयं, 'अप्रतिम ओंकार दादा..लय मोठा फॅन आहे भाऊ तुझा', त्याचबरोबर ओंकारच्या चाहत्यांनीही त्याच्यावर पुन्हा कौतुकाचा वर्षाव केला आहे.